​OMG : अक्षय कुमारचे ‘या’ अभिनेत्रीशी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2017 14:38 IST2017-07-19T06:38:03+5:302017-07-19T14:38:11+5:30

शीर्षक वाचून दचकलात ना? ट्विंकल खन्नाचा चित्रपट ‘पॅडमॅन’ मधील खिलाडी अक्षय कुमारचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनम ...

OMG: Extra marital affair with actress Akshay Kumar! | ​OMG : अक्षय कुमारचे ‘या’ अभिनेत्रीशी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर !

​OMG : अक्षय कुमारचे ‘या’ अभिनेत्रीशी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर !

र्षक वाचून दचकलात ना? ट्विंकल खन्नाचा चित्रपट ‘पॅडमॅन’ मधील खिलाडी अक्षय कुमारचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूरशी जोडले जात आहे. 

ही बातमी खरी आहे, मात्र दोघांचे अफेअर हे आॅफस्क्रीन नसून आॅनस्क्रीन आहे. 

अक्षय कुमार, सोनम कपूर आणि राधिका आपटे लवकरच ‘पॅडमॅन’ चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वी राधिका आपटेने चित्रपटातील आपल्या रोल बद्दल खुलासा केला होता. राधिकाने मीडियाला सांगितले की, ‘चित्रपटात अक्षयची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. मी त्यात अक्षयच्या पत्नीची भूमिका साकारत असून मी या चित्रपटासाठी खूपच एक्सायटेड आहे. काही चित्रपटात आपला रोल किती लांब आहे, याला महत्त्व नसते, तर आपली भूमिका किती दमदार आहे याला जास्त महत्त्व असते.'  असेही ती म्हणाली.
 
Sonam Kapoor to play the other woman in Akshay Kumar padman - Bollywood News in Hindi

नुकताच चित्रपटातील सोनम कपूरच्या भूमिकेचा खुलासा झाला आहे. त्यात राधिकासोबत लग्न केल्यानंतर अक्षय आणि सोनमचे अफेअर दाखविण्यात आले आहे. म्हणजेच अक्षयचे चित्रपटात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर दाखविण्यात येणार आहे.    

हा चित्रपट अरुणाचलम मुरुगनाथम यांच्या आयुष्यावर आधारित आहे. त्यांनी असे यंत्र बनविले होते की, जे स्वस्त दरात सॅनिटरी पॅड्सची निर्मिती करते. यासाठी त्यांना पद्मश्री अ‍ॅवॉर्डनेही सन्मानित करण्यात आले आहे. चित्रपटाची प्रोड्यूसर ट्विंकल खन्ना असून आ बाल्की डायरेक्ट करत आहे. चित्रपटात अमिताभ बच्चन केमियो करताना दिसणार आहेत. चित्रपटाची शुटिंग सध्या सुरु असून लवकरच अक्षयचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Also Read : अक्षय कुमारच्या ‘पॅडमॅन’मध्ये सोनम कपूर आणि राधिका आपटे
  

Web Title: OMG: Extra marital affair with actress Akshay Kumar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.