OMG!! अहमदाबादच्या हॉटेलमध्ये मिळणार 'बाहुबली' थाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2017 18:18 IST2017-04-18T12:41:19+5:302017-04-18T18:18:20+5:30

एस एस राजामौला यांच्या बाहुबली या चित्रपटावरुन प्रेरणा घेत गुजरातमध्ये एका थाळीचे नाव बाहुबली थाळी ठेवण्यात आले आहे. अहमदाबादच्या ...

OMG !! 'Bahubali' plate will be found in Ahmedabad hotel | OMG!! अहमदाबादच्या हॉटेलमध्ये मिळणार 'बाहुबली' थाळी

OMG!! अहमदाबादच्या हॉटेलमध्ये मिळणार 'बाहुबली' थाळी

एस राजामौला यांच्या बाहुबली या चित्रपटावरुन प्रेरणा घेत गुजरातमध्ये एका थाळीचे नाव बाहुबली थाळी ठेवण्यात आले आहे. अहमदाबादच्या हॉटेल राजवाडुमध्ये एका थाळीचे नाव बाहुबली ठेवण्यात आले आहे. हॉटेल राजवाडुचे मालक राजेश पटेल आणि मनीष पटेल बाहुबली चित्रपटाचे मोठे चाहते आहेत. त्यांनी बाहुबली या चित्रपटाचा पहिला भाग पाहिला आहे.  

राजेश पटेल आणि मनीष पटेल हे बाहुबलीसारख्या चित्रपटाला सन्मान देऊ इच्छितात यासाठी त्यांना हे पाऊल उचलले आहे. राडवाडु हॉटेल हे गुजराती आणि राजस्थानी जेवणासाठी प्रसिद्ध आहे. देशातील पर्यटकांबरोबर विदेशी पर्य़टक ही इथे मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. बाहुबली थाळीवरुन हॉटेलमधील जेवणातील भव्यता आणि राजवाडु समाजातील लोकांच्या आयुष्याचे दर्शन घडते. थाळी अतिशय प्रसन्नता पूर्वक सजवण्यात आली आहे जी बघून तुम्हाला शाहीपणाचा अंदाज येतो.  


कटप्पा ने बाहुबलीला का मारले या प्रश्नांने सोशल मीडियावर वादळ उठवलेले आहे. यातच राजवाडू हॉटेलचे मालक सुद्धा बाहुबलीच्या टीमला हाच प्रश्न विचारण्यासाठी उत्सुक आहेत.  
राजवाडू हॉटेलचे मालक बाहुबली चित्रपटाचा दुसरा भाग बघण्यास फारच उत्सुक आहेत. ते पहिल्याच दिवशी सहकुटुंब जाऊन हा चित्रपट पाहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बाहुबलीची संपूर्ण टीम येऊन या बाहुबली थाळीचा आस्वाद घेईल अशी आशाही त्यांना आहे. 




बाहुबली2 या चित्रपटात राणा डग्गुबती, अभिनेत्री तमन्ना भाटिया, अनुष्का शेट्टी, सत्यराज आणि रामा कृष्णन असे अनेक जण दिसणार आहेत.  याच महिन्यात 28 तारखेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  त्यामुळे बाहुबलीने कटप्पाला का मारले या प्रश्नांचे उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे. 

Web Title: OMG !! 'Bahubali' plate will be found in Ahmedabad hotel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.