OMG! ​‘बाहुबली’,‘कबाली’ पडले मागे; विवेक ओबेरॉयचा ‘हा’ चित्रपट करतोय रेकॉर्डतोड कमाई!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 12:30 IST2017-09-06T07:00:07+5:302017-09-06T12:30:07+5:30

सुपरस्टार अजीत सध्या जोरात आहे. केवळ अजीतच नाही तर बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय हा सुद्धा जोरात आहे. होय, उण्यापु-या ११ दिवसांत अजीत व विवेकच्या ‘विवेगम’ या चित्रपटाने ‘बाहुबली’चा विक्रम मोडीत काढला आहे.

OMG! 'Bahubali', 'Kabbali' fell behind; Vivek Oberoi's 'Ha' movie is recording record earnings !! | OMG! ​‘बाहुबली’,‘कबाली’ पडले मागे; विवेक ओबेरॉयचा ‘हा’ चित्रपट करतोय रेकॉर्डतोड कमाई!!

OMG! ​‘बाहुबली’,‘कबाली’ पडले मागे; विवेक ओबेरॉयचा ‘हा’ चित्रपट करतोय रेकॉर्डतोड कमाई!!

परस्टार अजीत सध्या जोरात आहे. केवळ अजीतच नाही तर बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय हा सुद्धा जोरात आहे. होय,  उण्यापु-या ११ दिवसांत अजीत व विवेकच्या ‘विवेगम’ या चित्रपटाने ‘बाहुबली’चा विक्रम मोडीत काढला आहे. विश्वास बसत नाहीयं ना? पण हे खरे आहे.‘विवेगम’ रिलीज होऊन केवळ ११ दिवस झाले आणि या ११ दिवसांत या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर धमाकेदार कमाई केली आहे. यंदाचा सर्वांत मोठा ब्लॉकबस्टर ‘बाहुबली2’च्या बॉक्सआॅफिस रेकॉर्डला ‘विवेगम’चांगलीच टक्कर देताना दिसतोय.



 गत २५ आॅगस्टला हा चित्रपट रिलीज झाला. यानंतर केवळ तीन ते चार दिवसांत हा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला होता. ११ व्या दिवशी या चित्रपटाने वर्ल्डवाईड १५२ कोटींचा गल्ला जमवला.  केवळ चेन्नईबद्दल बोलायचे झाल्यास ‘विवेगम’ने ‘बाहुबली’ला मागे टाकले आहे. आत्तापर्यंत ‘विवेगम’ने चेन्नईत ८.५० कोटींची कमाई करत ‘बाहुबली’ला मागे टाकले. कारण ‘बाहुबली’ने चेन्नई बॉक्सआॅफिसवर केवळ ८.२५ कोटींची कमाई केली होती. ‘बाहुबली’ने चेन्नईत तीन दिवसांत केवळ ३.२४ कोटी कमावले होते. पण अजीतच्या या चित्रपटाने तीन दिवसांत ४.२८ कोटींचा गल्ला जमवला आहे. ‘विवेगम’चे ओपनिंग डे कलेक्शन ३३.०८ कोटी होते. म्हणजेच ‘विवेगम’ने रजनीकांतच्या ‘कबाली’चा ओपनिंग डे रेकॉर्डही मोडीत काढला आहे.जीएसटी लागू झाल्यानंतर ‘विवेगम’ हा साऊथचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. पहिल्या आठवड्यात चित्रपटात वर्ल्डवाईड १०६ कोटी कमावले होते. अद्यापही चित्रपटाची घोडदौड सुरु आहे. यावरून ‘विवेगम’ने प्रेक्षकांना कसे वेड लावलेय, याचा अंदाज तुम्ही बांधू शकता. 

ALSO READ : विवेक ओबेरॉयला करायचा रोमॅण्टिक चित्रपट!

जगभरातील ३००० हजार स्क्रीन्सवर रिलीज झालेल्या या चित्रपटात अजीत कुमारशिवाय विवेक ओबेराय, अक्षरा हासन व काजल अग्रवाल मुख्य भूमिकेत आहेत. 

Web Title: OMG! 'Bahubali', 'Kabbali' fell behind; Vivek Oberoi's 'Ha' movie is recording record earnings !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.