नुसरत जहां मुलाला देणार नाही पित्याचे नाव, सिंगल मदर बनून करणार सांभाळ!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 02:15 PM2021-08-29T14:15:22+5:302021-08-29T14:16:10+5:30

बंगाली अभिनेत्री व टीएमसीच्या बहुचर्चित खासदार नुसरत जहां हिने नुकताच गोंडस मुलाला जन्म दिला. सध्या तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. शिवाय या मुलाचा बाप कोण? असा प्रश्नही तिला विचारला जातोय.

nusrat jahan decides not to reveal her baby father name | नुसरत जहां मुलाला देणार नाही पित्याचे नाव, सिंगल मदर बनून करणार सांभाळ!!

नुसरत जहां मुलाला देणार नाही पित्याचे नाव, सिंगल मदर बनून करणार सांभाळ!!

googlenewsNext
ठळक मुद्देनुसरत सध्या बंगाली अभिनेता यशदास गुप्तासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. अर्थात नुसरत वा यशदास दोघांनीही अधिकृतपणे आपल्या नात्याची घोषणा केलेली नाही.

बंगाली अभिनेत्री व टीएमसीच्या बहुचर्चित खासदार नुसरत जहां (Nusrat Jahan) हिने नुकताच गोंडस मुलाला जन्म दिला. सध्या तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. शिवाय या मुलाचा बाप कोण? असा प्रश्नही तिला विचारला जातोय. पण तूर्तास आपल्या मुलाच्या पित्याचे नाव तिने सांगण्यास नकार दिला आहे. चर्चा खरी मानाल तर, आपल्या मुलाचा ती सिंगल मदर  म्हणून सांभाळ करणार आहे.
नुसरतने 2019 मध्ये निखील जैनसोबत लग्न केले होते. तुर्कीत हा लग्नसोहळा पार पडला होता. या लग्नाचे फोटोही व्हायरल झाले होते. मात्र लग्नानंतर दोन वर्षांनी नुसरत व निखील यांच्या नात्यात मतभेद निर्माण झालेत आणि कौटुंबिक वाद चव्हाट्यावर आला. इतकेच नाही तर निखीलसोबतचे आपले लग्न अवैध असल्याचा दावा करून नुसरतने खळबळ निर्माण केली.

हे लग्न तुर्कीच्या कायद्यानुसार झाले होते. भारतात या लग्नाची नोंदणी झालेली नाही. त्यामुळे लग्नच वैध नाही तर घटस्फोट घेण्यादेण्याचा प्रश्नच उद्भवत नही, असे नुसरतने स्पष्ट केले होते. याचदरम्यान नुसरत गर्भवती असल्याची बातमी समोर आली होती. विशेष म्हणजे, यानंतर नुसरतच्या गर्भात वाढत असलेले बाळ आपले नाही, असे निखीलने जाहिरपणे सांगितले होते.

नुसरत सध्या बंगाली अभिनेता यशदास गुप्तासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. अर्थात नुसरत वा यशदास दोघांनीही अधिकृतपणे आपल्या नात्याची घोषणा केलेली नाही. अशात नुसरतने जन्म दिलेल्या बाळाचा पिता कोण? असा प्रश्न पडणे स्वाभाविक होते. पण नुसरतने बाळाच्या पित्याचा नावाचा खुलासा करण्यास नकार दिला आहे. चर्चा खरी मानाल तर सिंगल मदर म्हणूनच या बाळाला वाढवण्याचा निर्णय तिने घेतला आहे. 

Web Title: nusrat jahan decides not to reveal her baby father name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.