‘आता सेक्स बद्दल बोलूयात...’ रणवीरने के ले बोल्ड वेब सिरीजचे कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2016 15:30 IST2016-07-21T10:00:15+5:302016-07-21T15:30:15+5:30
समलैंगिकता, कंडोम्स, सेक्स अशा विषयाची चर्चाविषयी ‘वाय' फिल्मस म्हणजेच यशराज फिल्मसच्या युवा आघाडीने ''सेक्स चाट विथ पप्पू अँड पापा'' शो लाँच केला आहे.

‘आता सेक्स बद्दल बोलूयात...’ रणवीरने के ले बोल्ड वेब सिरीजचे कौतुक
यशराज फिल्मने शोधलेल्या अभिनेता रणवीर सिंगने या शोचे भरपूर कौतुक केले. शोच्या लाँचिंग इव्हेन्टमध्ये तो हजर होता. त्याने ट्विट करुन हा शो पाहण्याचे आवाहन केले आहे. या स्तुत्य उपक्रमामुळे लैंगिक शिक्षणाला मदत होईल असे त्याला वाटते.
''इसमे शर्म की क्या बात है ?'' असा बोर्ड त्याने एका हातात धरला आहे तर दुसºया हातात ''आता सेक्सबद्दल बोलूयात'' असा बोर्ड घेऊन रणवीर सिंगने फोटो काढला आहे.
आनंद तिवारी, कबीर साजिद, संजीदा शेख, अल्का अमिन आणि दिग्गज अभिनेता सचिन पिळगावकर यांच्या यात भूमिका आहेत. आशिष पाटील याने याचे दिग्दर्शन केले आहे. वैद्यकिय क्षेत्रातील जाणकारांच्या मदतीने याचे लिखाण गोपाल दत्त आणि देवंग कक्कड यांनी केले आहे.