​आता ऐका ‘काला चष्मा’ स्टाईल आरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2016 10:36 IST2016-09-09T08:58:35+5:302016-09-23T10:36:28+5:30

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कॅटरिना कैफने गणपतीच्या आरतीच्या सुरात काला चष्मा गाणे म्हटले आहे.

Now listen 'black glasses' style aarti | ​आता ऐका ‘काला चष्मा’ स्टाईल आरती

​आता ऐका ‘काला चष्मा’ स्टाईल आरती

त्रपट निर्माते-कलाकार प्रमोशनसाठी काय क्लृप्त्या करतील याचा काही नेम नाही. सध्या सगळीकडे ‘काला चष्मा’ फीव्हर चढलेला दिसतोय. तसेच गणेशोत्सवाचा ज्वरदेखील जोमात आहे.  म्हणून या दोघांचे कॉम्बिनेशन करत सिद्धार्थ मल्होत्रा आणि कॅटरिना कैफने गणपतीच्या आरतीच्या सुरात काला चष्मा गाणे म्हटले आहे. 

अमिताभ, शाहरुख, सलमान, करण जोहर यांच्या काळ्या चष्मा घातलेल्या फोटोंची त्यांनी ‘काला चष्मा’ स्टाईल आरती केली. सिद्धार्थने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा मजेशीर व्हिडिओ शेअर केला. गेल्या शुक्रवारी रिलीज झालेल्या त्यांच्या ‘बार बार देखो’ सिनेमातील या गाण्याने इंटरनेटविश्वात अक्षरश: धुमाकू ळ घातलेला आहे. 

प्रथमच एकत्र काम करणाऱ्या सिद्धार्थ आणि कॅटच्या जोडीला प्रेक्षकांची पसंतीसुद्धा मिळत आहे. त्यामुळे आता आणखी काय नवीन पाहायला मिळते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
 

Web Title: Now listen 'black glasses' style aarti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.