आता बेडरूममधील फोटोवरून ट्रोल होतेय अमिषा पटेल; युजर्सनी म्हटले, ‘आता हेच काम राहिले’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2018 15:07 IST2018-02-21T09:36:55+5:302018-02-21T15:07:05+5:30
अमिषा पटेल सातत्याने तिचे बोल्ड फोटो शेअर करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करीत आहे. कालच बिकिनी फोटो शेअर केल्यानंतर पुन्हा एकदा तिने हॉट फोटो शेअर केला आहे.

आता बेडरूममधील फोटोवरून ट्रोल होतेय अमिषा पटेल; युजर्सनी म्हटले, ‘आता हेच काम राहिले’!
अ िनेत्री अमिषा पटेल सध्या तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील बोल्ड फोटोंमुळे जबरदस्त चर्चेत आहे. सातत्याने तिच्या फोटोंवरून चर्चा रंगत असल्याने ती सध्या युजर्सच्या निशाण्यावर आहे. कारण बºयाचदा ती तिचे असे काही फोटोज् अपलोड करते ज्यामुळे युजर्स तिला ट्रोल करतात. काही दिवसांपूर्वीच तिने स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करतानाचा एक बिकिनी फोटो शेअर केला होता. ज्यामुळे युजर्सनी त्यास अतिशय अश्लील अशा स्वरूपाच्या कॉमेण्ट्स दिल्या होत्या. आता तिने आणखी एक फोटो शेअर केला असून, त्यामुळे ती पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. हा फोटो तिच्या बेडरूममधील असून, त्यात ती टॉपलेस होताना दिसत आहे. बेडवर झोपलेली अमिषा खूपच बोल्ड लुक्स देत असल्याने युजर्स त्यास खूपच उलटसुलट प्रतिक्रिया देत आहेत. एका युजर्सनी लिहिले की, ‘तुझ्याकडे आता हेच काम शिल्लक राहिले आहे काय?’
ALSO READ : अमिषा पटेलच्या हॉट बिकिनी फोटोशूटवर ट्रोलर्सचा हल्लाबोल!
एका युजरने कॉमेण्ट बॉक्समध्ये अमिषाला आॅफ फॉर्म अभिनेत्री म्हटले. एका अन्य युजरने तिला थेट विचारले की, अखेर तू असे का करीत आहेस? नदीम नावाच्या युजरने लिहिले की, असे तेव्हा घडत असते जेव्हा फॉर्ममधून बाहेर झालेली अभिनेत्री आपले अटेंशन वाढविण्यासाठी असे उद्योग करीत असते. एका युजरने लिहिले की, अमिषा आता आंटी झाली आहे. वास्तविक पहिल्यांदाच अमिषाच्या फोटोला अशाप्रकारच्या कॉमेण्ट्स येत आहेत, असे अजिबात नाही. या अगोदरही युजर्सनी तिच्या फोटोंना अशाप्रकारच्या कॉमेण्ट्स दिल्या आहेत.
अमिषा पटेलबद्दल सांगायचे झाल्यास, ती अखेरीस ‘शॉर्टकट रोमियो’ या चित्रपटात बघावयास मिळाली होती. त्यानंतर तिने काही छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या, मात्र त्यातून तिला फारशी लोकप्रियता मिळाली नाही. विकीपीडियावर उपलब्ध माहितीनुसार, २०१८ मध्ये अमिषाचे दोन चित्रपट येणार आहेत. ‘देसी मॅजिक’ आणि ‘भईयाजी सुपरहिट’ अशी त्यांची नावे आहेत. असेदेखील म्हटले जात आहे की, अमिषाचे हे चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदर ती चर्चेत राहण्यासाठीच अशाप्रकारचे फोटोज् शेअर करीत आहे.