रातोरात सुपरस्टार बनलेला ‘हा’ अभिनेता आता असा दिसतो; ओेळखणेही झाले मुश्किल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2018 20:53 IST2018-03-10T15:23:12+5:302018-03-10T20:53:26+5:30
रातोरात सुपरस्टार बनलेल्या या अभिनेत्याचा लूक प्रचंड बदलला असून, त्याला आता ओळखणेही मुश्किल झाले आहे.
.jpg)
रातोरात सुपरस्टार बनलेला ‘हा’ अभिनेता आता असा दिसतो; ओेळखणेही झाले मुश्किल!
१ ९० मध्ये आलेल्या ‘आशिकी’मधून रातोरात सुपरस्टार बनलेला अभिनेता राहुल रॉय सध्या इंडस्ट्रीतून जणू काही गायबच झाला आहे. चॉकलेटी लूक असलेल्या राहुलने पहिल्याच चित्रपटातून तरुणींच्या हृदयात स्थान मिळविले. मात्र त्यानंतर त्याचा एकही चित्रपट हिट झाला नाही. पर्यायाने त्याचे करिअरच जणू काही संपुष्टात आले. पुढे त्याने ‘बिग बॉस’ या सर्वाधिक वादग्रस्त रिअॅलिटी शोच्या सीजन १ मध्ये नशीब आजमाविले. याठिकाणी पुन्हा एकदा त्याला यशाची चव चाखता आली. पहिल्याच सीजनचा तो विजेता ठरला. मात्र हे यशदेखील ‘वन नाइट वंडर’ बनले. त्यानंतर तो कुठेही झळकला नाही. मात्र गेल्या काहीकाळात जेव्हा तो समोर आला तेव्हा त्याचा लूक प्रचंड बदलेला दिसला. त्याला ओळखणेही मुश्किल झाले.
राहुल रॉयने इन्स्टाग्रामवर त्याचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले. ज्यामध्ये त्याच्या हेअरस्टाइलपासून ते हेअरकलरपर्यंत सर्व काही बदलेले दिसत आहे. त्याने त्याच्या आगामी ‘वेलकम टू रशिया’ या चित्रपटासाठी मेकओवर केला आहे. चित्रपटात तो एका भ्रष्ट पोलीस अधिकाºयाची भूमिका साकारणार आहे. त्याची भूमिका एका अशी व्यक्तीची आहे, जो निम्मा रूसी आणि निम्मा भारतीय आहे. राहुल रॉयने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, मी गेल्या नऊ वर्षांपासून आॅस्ट्रेलियाला राहत आहे. मी २०१५ मध्ये भारतात परतण्याचा निर्णय घेतला. वास्तविक मधल्या काळात २००७ मध्ये तो काहीकाळ भारतात आला होता. याच दरम्यान त्याने बिग बॉसच्या शोमध्ये भाग घेतला होता.
दरम्यान, तब्बल १२ वर्षांच्या गॅपनंतर राहुल रॉय ‘वेलकम टू रशिया’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर कमबॅक करीत आहे. या अगोदर तो ‘नॉटी बॉय’ या चित्रपटात २००६ मध्ये झळकला होता. राहुल रॉय सध्या रूसमध्ये आहे. ज्याठिकाणी त्याच्या चित्रपटाची शूटिंग सुरू आहे. असे म्हटले जात आहे की, त्याचा हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार आहे. नितीन गुप्ता या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत.