इटलीच्या नव्हे तर जर्मनीच्या आहेत ‘या’ सोनिया गांधी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2018 15:44 IST2018-04-07T10:12:38+5:302018-04-07T15:44:09+5:30

माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या जीवनावर आधारित बनत असलेल्या ‘द एक्सीडेंटल प्राइममिनिस्टर’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. अभिनेते ...

Not of Italy, but of Germany, this is 'Sonia Gandhi!' | इटलीच्या नव्हे तर जर्मनीच्या आहेत ‘या’ सोनिया गांधी!

इटलीच्या नव्हे तर जर्मनीच्या आहेत ‘या’ सोनिया गांधी!

जी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या जीवनावर आधारित बनत असलेल्या ‘द एक्सीडेंटल प्राइममिनिस्टर’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. अभिनेते अनुपम खेर हे मनमोहनसिंग यांची भूमिका साकारत आहेत. तर चित्रपटात सोनिया गांधी यांच्या भूमिकेत सुजॅन बर्नर्ट ही जर्मनी येथील अभिनेत्री बघावयास मिळणार आहे. सुजॅनने ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. तिने ट्विटमध्ये लिहिले की, '#theaccidentalprimeminister.... सर्वकाही निश्चित झाले आहे. हिंदी आणि इंग्रजी दोन्ही स्क्रिप्ट तयार आहेत. ११ तारखेला इंग्लंड #soniagandhi #anupamkher हा माझ्यासाठी खूपच आनंदाचा क्षण आहे #actresslife'

हा चित्रपट संजय बारू यांच्या ‘द एक्सीडेंट प्राइममिनिस्टर’ या पुस्तकावर आधारित आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन विजय रत्नीकर गुट्टे यांचे आहे. तर हंसल मेहता चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्यूसर आहेत. अक्षय खन्ना चित्रपटात संजय बारूची भूमिका साकारत आहे. दरम्यान, सुजॅन विदेशी कलाकार असली तरी, तिला सर्वच प्रकारच्या भारतीय भाषा ज्ञात आहेत. हिंदी, बंगाली, मराठी भाषा तिला चांगल्या पद्धतीने समजतात अन् बोलताही येतात. त्याचबरोबर तिने ‘नो प्रॉब्लम, हनिमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेट’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. तसेच काही मालिकांमध्येही ती झळकली आहे. 



वास्तविक सुजॅन पहिल्यांदाच सोनिया गांधी यांची भूमिका साकारत आहे, असे नाही तर तिने या अगोदर ‘७आरसीआर’ नावाच्या टीव्ही मालिकेत सोनिया गांधी यांची भूमिका साकारली होती. सुजॅन एक ट्रेंड बॅले डान्सर आहे. त्याचबरोबर लावणीतही ती चांगलीच पारांगत आहे. सुजॅनचे लग्न प्रसिद्ध टीव्ही कलाकार अखिल मिश्रा यांच्यासोबत झाले आहे. वास्तविक अखिलने बºयाचशा अविस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. त्यात ‘थ्री इडियट’मधील लायब्रेनियनची भूमिका अधिक अविस्मरणीय ठरली आहे. 

Web Title: Not of Italy, but of Germany, this is 'Sonia Gandhi!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.