​‘बाहुबली2’चे हे नवे पोस्टर पाहाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2017 13:59 IST2017-03-26T08:29:28+5:302017-03-26T13:59:28+5:30

‘बाहुबली2’ अर्थात ‘बाहुबली : दी कन्क्लूजन’ या चित्रपटाइतकी कुठल्याच दुसºया चित्रपटाची प्रतीक्षा केली गेली नसेल. सगळे जण या चित्रपटाची ...

This new poster of 'Bahubali2' will be seen! | ​‘बाहुबली2’चे हे नवे पोस्टर पाहाच!

​‘बाहुबली2’चे हे नवे पोस्टर पाहाच!

ाहुबली2’ अर्थात ‘बाहुबली : दी कन्क्लूजन’ या चित्रपटाइतकी कुठल्याच दुसºया चित्रपटाची प्रतीक्षा केली गेली नसेल. सगळे जण या चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. चित्रपटाचे मेकर्सही ही बाब जाणून आहेत आणि कदाचित म्हणूनच लोकांच्या उत्सुकतेत भर घालण्याचे काम त्यांनी चालवले आहे. होय, ‘बाहुबली2’चे हे नवे पोस्टर पाहिल्यानंतर असेच म्हणावे लागेल. हे पोस्टर पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर रोमांच उठल्याशिवाय राहणार नाहीत. यात ‘बाहुबली2’चा हिरो प्रभास युद्ध भूमीवर दिसतो आहे. एका योद्धयाला साजेसा त्याचा अंदाज पाहत राहावा, असा आहे. अलीकडे या चित्रपटाचे ट्रेलर लॉन्च झाले होते. 

{{{{twitter_post_id####}}}}


ALSO READ : bahubali-2 trailer : केवळ अदभूत! डोळे दिपवून टाकणारा प्रोमो!!

‘बाहुबली2 : दी कन्क्लूजन’ २८ एप्रिलला रिलीज होणार आहे.  हा चित्रपट ‘बाहुबली: द बिगिनिंग’चा सीक्वल आहे. ‘बाहुबली2 : दी कन्क्लूजन’ चे ट्रेलर रिलिज झाल्याच्या दहा तासांत ते १४ कोटींपेक्षा अधिक लोकांनी बघितले होते. ‘बाहुबली’च्या पहिल्या भागात  कटप्पाने बाहुबलीला का मारले? या प्रश्नाने प्रेक्षकांच्या मनात काहूर निर्माण केला आहे. प्रत्येकालाच या प्रश्नाचे उत्तर हवे असल्याने सिनेमाची आतुरता आता शिगेला पोहोचली आहे.   तामिळ, मल्याळम, तेलगू, हिंदी आदि भाषांमध्ये हे ट्रेलर रिलिज करण्यात आले होते. सर्वाधिक तेलगू भाषेतील ट्रेलर बघितले गेले.  ट्रेलरमध्ये बाहुबलीच्या जवळपास सर्वच पात्रांना स्थान दिले आहे. त्याचबरोबर अ?ॅक्शनचा जबरदस्त धमाका बघावयास मिळत आहे. प्रभास, राणा दग्गुबाती, सत्यराज, अनुष्का शेट्ट, तमन्ना भाटिया आणि राम्या सारख्या कलाकारांची झलक प्रेक्षकांना मोहित करीत आहे. आता हा सिनेमा रिलिज होण्याची आतुरता  आहे. 

Web Title: This new poster of 'Bahubali2' will be seen!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.