आलिया भट्ट व रणबीर कपूरच्या फोटोवर नीतू सिंग यांची क्यूट कमेंट!!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 18:18 IST2018-09-16T18:15:58+5:302018-09-16T18:18:43+5:30
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर स्टारर ‘ब्रह्मास्त्र’चे शूटींग संपलेय. आता शूटींग संपल्यावर पार्टी तर बनतेच. आलिया व रणबीरने हीच संधी साधली आणि पार्टी करण्यासाठी एका पबमध्ये पोहोचलेत.

आलिया भट्ट व रणबीर कपूरच्या फोटोवर नीतू सिंग यांची क्यूट कमेंट!!
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर स्टारर ‘ब्रह्मास्त्र’चे शूटींग संपलेय. आता शूटींग संपल्यावर पार्टी तर बनतेच. आलिया व रणबीरने हीच संधी साधली आणि पार्टी करण्यासाठी एका पबमध्ये पोहोचलेत. ‘ब्रह्मास्त्र’चा दिग्दर्शक अयान मुखर्जी हा सुद्धा या कपलसोबत होता. तिघांनीही पार्टी मस्त एन्जॉय केली. सोबत या पार्टीचा फोटोही अपलोड केला. रणबीर व आलियाचा हा फोटो पाहिला आणि चाहत्यांनी एका पाठोपाठ एक कमेंट देणे सुरू केले. यातल्या एका कमेंटने मात्र सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. होय, ही कमेंट होती रणबीरची मॉम नीतू सिंग यांची. नीतू यांनी आलिया व रणबीरच्या या फोटोवर सुंदर कमेंट दिली. या कमेंटमध्ये काहीही न बोलता नीतू खूप काही बोलून गेल्या. आलिया आपल्याला किती आवडते, हेच जणू त्यांनी यातून दर्शवले. नीतूने दिलेली ही कमेंट तुम्ही खाली पाहू शकता.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूरएकमेकांना डेट करताहेत, हे कुणापासूनही लपून राहिलेले नाही. पण आता हे लव्हबर्ड्स लवकरच लग्न करणार, अशी चर्चा जोरात आहे. दोघांमधील वाढती जवळीकही हेच सांगणारी आहे. आलिया व रणबीरचे कुटुंब आता एकमेकांना भेटणार आहेत. ब्रह्मास्त्रचे शूटींग संपताच भट्ट आणि कपूर कुटुंबाने फॅमिली डिनरचा प्लान केला असल्याचे कळतेय. खरे तर आलिया व रणबीर दोघांचाही एकमेकांच्या कुटुंबासोबत खूप चांगला बॉन्ड आहे. आलिया अनेकदा रणबीरची मॉम नीतू कपूर यांच्यासोबत दिसली आहे. रणबीरची बहीण रिद्धिमा हिच्यासोबतही आलिया दिसली आहे. रणबीरही अर्ध्या रात्री आलियाचे डॅड महेश भट्ट यांच्यासोबत दिसला आहे. केवळ इतकेच नाही तर आलियाचा आई सोनी राजदान ही सुद्धा रणबीरची फॅन आहे. नीतू सिंग व सोनी राजदान या दोघींनी अलीकडे ‘संजू’ हा रणबीरचा चित्रपट एकत्र पाहिला होता. या साऱ्या गोष्टी आलिया व रणबीरआपल्या नात्याबद्दल गंभीर आहेत, याकडे इशारा करणा-या आहेत.