नवाजुद्दीनकडून बरंच काही शिकण्यासारखं -टायगर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2016 06:04 PM2016-12-07T18:04:23+5:302016-12-07T18:04:23+5:30

‘बजरंगी भाईजान’ मध्ये सल्लूमियाँसोबत मुख्य भूमिकेत दिसलेला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा अल्पावधीतच स्टार झाला. त्याचे अपार कष्ट, कामाबद्दलची निष्ठा, ...

Nawazuddin learns from a lot of things - Tiger | नवाजुद्दीनकडून बरंच काही शिकण्यासारखं -टायगर

नवाजुद्दीनकडून बरंच काही शिकण्यासारखं -टायगर

googlenewsNext
जरंगी भाईजान’ मध्ये सल्लूमियाँसोबत मुख्य भूमिकेत दिसलेला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा अल्पावधीतच स्टार झाला. त्याचे अपार कष्ट, कामाबद्दलची निष्ठा, त्याचे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व हे त्याच्या यशाचे गमक म्हटले पाहिजेत. लवकरच तो टायगर श्रॉफसोबत ‘मुन्ना मायकेल’ मध्ये हटके रूपात दिसणार आहे. चित्रपटाच्या शूटिंगनिमित्ताने हे दोन कलाकार एकत्र आले. टायगर नवाजुद्दीनवर एवढा प्रभावित झाला की, तो म्हणाला, ‘नवाज हा अमेझिंग कलाकार असून त्याच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे.’ 



‘निकलडन होस्ट किड्स चॉईस अ‍ॅवॉर्ड्स’ मध्ये टायगर म्हणाला,‘मुन्ना मायकेलच्या निमित्ताने मी नवाजुद्दीन सिद्दीकी सोबत काम करतोय. त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव अतिशय अमेझिंग आहे. अनेक गोष्टी त्याच्याकडून शिकण्यासारख्या आहेत. त्याच्यासोबत मला काम करायला मिळतेय हे माझे भाग्यच. कुठलीही भूमिका तो तेवढ्याच आदराने आणि निष्ठेने साकारतो. चित्रपटात तो खलनायकाची भूमिका साकारतो आहे. डान्सवर आधारित हा चित्रपट असून, या चित्रपटासाठी त्याने त्याच्या डान्स स्टेप्सवर विशेष लक्षकेंद्रित केले आहे. असं वाटतं की, त्याच्या चाहत्यांना त्याची भूमिका फार आवडेल. ही भूमिका अत्यंत वेगळ्या प्रकारची आहे.’



‘मांझी’,‘ रईस’ ,‘बजरंगी भाईजान’ यासारख्या चित्रपटात उत्तम भूमिका साकारून अल्पावधीत नवाजुद्दीन सिद्दीकी बी टाऊनमध्ये चर्चेत आला. रईस मध्ये तो एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असून, मुन्ना मायकेल मध्ये तो डान्सरच्या भूमिकेत दिसेल. विविधांगी भूमिकांचे वलय असणारे त्याचे व्यक्तिमत्त्व बॉलिवूडमधून एका उत्तम कलाकाराची निर्मिती करणारे आहे. 

Web Title: Nawazuddin learns from a lot of things - Tiger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.