नर्गिस फखरीचा एकच सवाल; माझ्या लग्नासाठी तुम्ही इतके उतावीळ का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2017 11:20 IST2017-05-03T05:48:56+5:302017-05-03T11:20:07+5:30
अलीकडे नर्गिस फखरी अभिनेता उदय चोप्रासोबत स्पॉट झाली होती. मुंबई एअरपोर्टवर दोघेही एकत्र बाहेर पडत असताना मीडियाने या दोघांना ...

नर्गिस फखरीचा एकच सवाल; माझ्या लग्नासाठी तुम्ही इतके उतावीळ का?
अ ीकडे नर्गिस फखरी अभिनेता उदय चोप्रासोबत स्पॉट झाली होती. मुंबई एअरपोर्टवर दोघेही एकत्र बाहेर पडत असताना मीडियाने या दोघांना घेरले होते. पण मीडियाला बघताच, नर्गिसने आपला चेहरा स्कार्पने झाकून घेतला होता. मग काय? नर्गिस व उदय या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चेने पुन्हा जोर धरला होता. खरे तर गतवर्षी दोघांचे ब्रेकअप झाल्याची बातमी आली होती. यामुळे नर्गिस डिप्रेशनमध्ये गेल्याचेही कानावर आले होते. अर्थात नर्गिसने हे वृत्त नाकारले होते. शिवाय उदय व ती रिलेशनशिपमध्ये आहे, याचेही तिने खंडन केले होते. पण यानंतर सुमारे वर्षभरानंतर दोघेही एकत्र विमानतळावर दिसले म्हटल्यावर चर्चा तर होणारच. नर्गिस व उदय लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार, असेही या चर्चेदरम्यान ऐकवात आले. पण कदाचित नर्गिसला ही चर्चा रूचलेली नाही. त्यामुळे तिने यावर खुलासा केला आहे.
![]()
![]()
ALSO READ : see pics : उदय चोप्रा बिनधास्त मग नर्गिस फखरीने का लपवला चेहरा?
होय, twitterचा आधार घेत, नर्गिसने तिच्या व उदयच्या लग्नाची बातमी धुडकावून लावली आहे.Wow u guys really love making stuff up. now who started this rumor . I think u r dying for me to marry someone, असा खुलासा तिने केला आहे. एकंदर काय तर माझ्यात व उदयमध्ये काहीही नाही, याचा तिने नव्याने पुनरूच्चार केला आहे. आता खरे काय नि खोटे काय, हे नर्गिसलाच ठाऊक़ पण जगाच्या पाठीवर उदय चोप्रा इतका चांगला व्यक्ती मला भेटलेला नाही. उदय ज्याच्या कुणाच्या आयुष्यात असेल, ते त्याचे नशीब,असे मी म्हणेल. तो माझ्या आयुष्याचा भाग आहे आणि राहिल, असे नर्गिस एका मुलाखतीत म्हणाली होती. आता याचा अर्थ काय, हेही तिलाच ठाऊक़