माझा मार्ग मी बनवला - देसी गर्ल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2016 17:36 IST2016-11-25T17:34:40+5:302016-11-25T17:36:58+5:30

बॉलिवूडची ‘ देसी गर्ल ’ प्रियांका चोप्रा हिचे नाव आता केवळ भारतातच नव्हे तर ग्लोबल पातळीवर प्रसिद्धीस आलेय. यामागे ...

My way I made - Desi Girl | माझा मार्ग मी बनवला - देसी गर्ल

माझा मार्ग मी बनवला - देसी गर्ल

लिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा हिचे नाव आता केवळ भारतातच नव्हे तर ग्लोबल पातळीवर प्रसिद्धीस आलेय. यामागे तिचे परिश्रम, कामाप्रती त्याग, समर्पण, वडिलांचे आशीर्वाद, चाहत्यांचे प्रेम व शुभेच्छा आहेत, असे ती मानते. जगाच्या पाठीवरील एक प्रसिद्ध व्यक्तीमत्त्व असूनही अतिशय नम्रपणे ती चाहत्यांचे सोशल मीडियावर आभार मानते. 



तिच्या आत्तापर्यंतच्या संघर्षाविषयी ती सांगते,‘कुणाच्याही पाठिंब्याशिवाय मी माझे करिअर सुरू केले. मुंबईत आले तेव्हा मी पूर्णपणे नवीन होते. माझी कुणाशी ओळख देखील नव्हती. पण, तरीही मी माझा मार्ग स्वत: बनवला. चाहत्यांकडून मिळालेले प्रेम आणि पाठिंबा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा ठरला. १७ व्या वर्षी मी ‘मिस वर्ल्ड’चा किताब पटकावला. त्यानंतर सर्वत्र माझे कौतुकच झाले. या यशामागे माझे परिश्रम, कष्ट, कामाप्रतीची श्रद्धा होती.’

‘द हिरो : लव्हस्टोरी आॅफ अ स्पाय’ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. केवळ कष्ट, कष्ट आणि कष्टच ती करत राहिली. ‘जय गंगाजल‘, ‘बफी’,‘दिल धडक ने दो’,‘बाजीराव मस्तानी’, ‘मेरी कोम’ या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनयाचे सादरीकरण केल्यानंतर तिला अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको’ मध्ये काम करायला मिळाले. ‘क्वांटिको’ या शोला मिळत असलेला प्रतिसाद पाहून त्याचा ‘सीजन २’ देखील लाँच करण्यात आला. ‘व्हेंटिलेटर’च्या माध्यमातून तिने निर्मितीक्षेत्रातही पाऊल ठेवले. पीसी, तुला आणखी यशस्वी होताना तुझ्या चाहत्यांना पहावयाचे आहे. तुझ्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा!!

Web Title: My way I made - Desi Girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.