अॅण्ड पिक्चर्सवर या दिवशी दाखवला जाणार टायगर श्रॉफचा मुन्ना मायकल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2018 10:59 IST2018-05-01T05:29:52+5:302018-05-01T10:59:52+5:30

जिवावर बेतणारे स्टंट प्रसंग आणि जबरदस्त डान्स यामुळे टायगर श्रॉफने आजवर लक्षावधी चाहते निर्माण केले आहेत. टायगर श्रॉफ हा ...

Munna Michael of Tiger Shroff will be featured on Andy Pictures on this day | अॅण्ड पिक्चर्सवर या दिवशी दाखवला जाणार टायगर श्रॉफचा मुन्ना मायकल

अॅण्ड पिक्चर्सवर या दिवशी दाखवला जाणार टायगर श्रॉफचा मुन्ना मायकल

वावर बेतणारे स्टंट प्रसंग आणि जबरदस्त डान्स यामुळे टायगर श्रॉफने आजवर लक्षावधी चाहते निर्माण केले आहेत. टायगर श्रॉफ हा सध्याचा भारतीय तरुणाईचा आयकॉन बनला आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. टायगरने हिरोपंती या चित्रपटापासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याच्या बागी या चित्रपटाने त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर आलेल्या त्याच्या मुन्ना मायकल या चित्रपटाला देखील प्रेक्षकांनी चांगले प्रेम दिले. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे देखील कौतुक झाले होते. त्याच्या या ‘मुन्ना मायकल’ चित्रपटाचे प्रसारण येत्या शुक्रवारी, ४ मे रोजी रात्री आठ वाजता नए इंडिया का ब्लॉकबस्टर मूव्ही चॅनल असलेल्या ‘अॅण्ड पिक्चर्स’ वाहिनीवरून करण्यात येणार आहे. या चित्रपटात टायगरच्या जोडीला नवाजुद्दीन सिद्दिकी आणि नवी तारका निधी अगरवाल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. शब्बीर खान यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची कथा म्हणजे एका होतकरू नर्तकाच्या जीवनातील प्रेम, आकांक्षा, स्वप्ने आणि दगाबाजी या भावनांचे मिश्रण आहे. यातील जबरदस्त अॅक्शन प्रसंगांमुळे प्रेक्षकांच्या हृदयात थरार वाढतो.
‘मुन्ना मायकल’ ही मायकल जॅक्सन (रोनित रॉय) या संघर्ष करणाऱ्या नर्तकाने वाढवलेल्या मुन्ना (टायगर श्रॉफ) या अनाथ मुलाची कथा आहे. चाळीत वाढलेला मुन्ना लोकांना हातोहात फसवून झटपट पैसे कमावण्याची कला शिकतो. लवकरच तो दिल्लीला जातो आणि तिथे त्याची गाठ महिंदर फौजी (नवाजुद्दिन सिद्दिकी) या स्थानिक डॉनशी पडते. दुसऱ्यांना ठार मारताना फारसा विचार न करणारा हा ४२ वर्षांचा डॉन चक्क डॉली (निधी अगरवाल) या तरुण नर्तकीच्या प्रेमात पडतो. डॉलीला आपल्या प्रेमात पाडण्यासाठी डॉन मुन्नाची मदत घेतो. पण विचित्र दैवयोग असा की मुन्ना स्वत:च तिच्या प्रेमात पडतो. यानंतर घडणाऱ्या वेगवान घडामोडींमध्ये आहे डॉनचा मुन्नावर सूड उगविण्याचा प्रयत्न आणि त्यातील नाट्य. खरा प्रश्न असा आहे की महिंदर आणि त्याच्या गुंडांपासून मुन्ना स्वत:चा बचाव करू शकतो का? डॉली आणि मुन्नाची प्रेमकथा कशाप्रकारे फुलते हे प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. 

Also Read : अनेक वर्षानंतर अॅक्शन करताना दिसणार अक्षय कुमार, टायगर श्रॉफच्या 'बागी3'मध्ये

Web Title: Munna Michael of Tiger Shroff will be featured on Andy Pictures on this day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.