मुकेश अंबानी यांच्या प्रायव्हेट जेटने मुंबईत आणणार श्रीदेवींचे पार्थिव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2018 18:46 IST2018-02-25T13:16:10+5:302018-02-25T18:46:10+5:30

बॉलिवूडची ‘हवा हवाई गर्ल’ श्रीदेवी यांच्या निधनामुळे जगभरातील त्यांचे चाहते स्तब्ध झाले आहेत. सध्या श्रीदेवी यांचे पार्थिव दुबई येथे ...

Mukesh Ambani's private jet to bring Sreedadevi's body to Mumbai? | मुकेश अंबानी यांच्या प्रायव्हेट जेटने मुंबईत आणणार श्रीदेवींचे पार्थिव?

मुकेश अंबानी यांच्या प्रायव्हेट जेटने मुंबईत आणणार श्रीदेवींचे पार्थिव?

लिवूडची ‘हवा हवाई गर्ल’ श्रीदेवी यांच्या निधनामुळे जगभरातील त्यांचे चाहते स्तब्ध झाले आहेत. सध्या श्रीदेवी यांचे पार्थिव दुबई येथे असून, रात्री उशिरापर्यंत मुंबईत आणले जाण्याची शक्यता आहे. ... या वेबसाइटच्या वृत्तानुसार, उद्योगपती मुकेश अंबानी यांनी श्रीदेवी यांचे पार्थिव भारतात आणण्यासाठी आपले प्रायव्हेट जेट आॅफर केले आहे. या वेबसाइटने हीदेखील माहिती दिली की, श्रीदेवी ज्या हॉटेलमध्ये होत्या, त्याच हॉटेलच्या रूममधील बाथरूममध्ये त्यांची बॉडी मिळाली. 

यूएईच्या सर्वात मोठ्या गल्फ न्यूज या वृत्तपत्राने श्रीदेवी यांच्या निधनाच्या बातमीला प्रमुख जागा दिली. या वृत्तपत्राच्या वेबसाइटवर सुत्रांच्या हवाल्यानुसार लिहिले की, मुकेश अंबानी यांनी श्रीदेवी यांची डेड बॉडी भारतात आणण्यासाठी त्यांचे प्रायव्हेट जेट आॅफर केले आहे. वास्तविक या बातमीला अद्यापपर्यंत अधिकृतरित्या दुजोरा मिळाला नाही. 



दरम्यान, श्रीदेवी पती बोनी कपूर आणि मुलगी खुशी यांच्यासोबत ज्या हॉटेलमध्ये थांबल्या होत्या त्या हॉटेलचे नाव अमीरात टॉवर आहे. या हॉटेलला प्रसिद्ध हॉटेल चेन जुमॅरा ग्रुप आॅपरेट करतात. दरम्यान यूएईमध्ये असलेले इंडियन अ‍ॅम्बेसेडर नवदीप सिंग सूरी हे श्रीदेवीचे पार्थिव भारतात आणण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडत असल्याचे समजते. त्यांनी ट्विट करून श्रीदेवीच्या निधनावर दु:खही व्यक्त केले होते. 

Web Title: Mukesh Ambani's private jet to bring Sreedadevi's body to Mumbai?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.