श्री रेड्डीचा दावा, मी अनेक निर्मात्यांना माझे न्यूड व्हिडीओ अन् फोटो पाठविले पण काम मिळाले नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2018 17:35 IST2018-04-08T12:05:01+5:302018-04-08T17:35:55+5:30

तेलगू अभिनेत्री श्री रेड्डीने कास्टिंग काउचचा कडाडून विरोध करण्यासाठी अतिशय विचित्र पद्धतीने विरोध केला. तिने भर रस्त्यात अर्धनग्न होत ...

Mr. Reddy's claim, I sent my nude video and photo to many producers but got no work! | श्री रेड्डीचा दावा, मी अनेक निर्मात्यांना माझे न्यूड व्हिडीओ अन् फोटो पाठविले पण काम मिळाले नाही!

श्री रेड्डीचा दावा, मी अनेक निर्मात्यांना माझे न्यूड व्हिडीओ अन् फोटो पाठविले पण काम मिळाले नाही!

लगू अभिनेत्री श्री रेड्डीने कास्टिंग काउचचा कडाडून विरोध करण्यासाठी अतिशय विचित्र पद्धतीने विरोध केला. तिने भर रस्त्यात अर्धनग्न होत कास्टिंग काउचबद्दलचा रोष व्यक्त केला. श्रीच्या या विचित्र आंदोलनाने चक्रावून गेलेल्या पोलिसांनी तिला लगेचच ताब्यात घेतले. दरम्यान श्रीने सांगितले की, मी कास्टिंग काउचचा विरोध केल्यामुळे माझी Movie Artistes Association (MAA) मेंबरशिप रद्द केली गेली. त्यामुळेच मी सार्वजनिकरीत्या मीडियासमोर हे अर्धनग्न आंदोलन केले. 

श्री रेड्डीने आरोप करताना म्हटले की, ‘मी इंडस्ट्रीत बºयाचशा निर्मात्यांना माझे नग्न फोटोज् आणि व्हिडीओ पाठविले. मी हे सर्व त्यांच्या डिमांडनुसार केले. मात्र अशातही दिलेले आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही. तसेच एकाही चित्रपटात मला काम दिले नाही.’ श्रीने सांगितले की, ‘इंडस्ट्रीत ७५ टक्के भूमिकांसाठी अभिनेत्रींना काही ना काही मोबदला द्यावाच लागतो.’ 



श्रीने ‘Mee Too’ या अभियानांतर्गत कोणाचे नाव न घेता सांगितले की, चित्रपटात रोल एक्सचेंज करण्यासाठी एका महिलेने तिला सेक्शुअल फेवरची मागणी केली होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ‘अय्यारी’ची अभिनेत्री रकुल प्रीत सिंग हिने कास्टिंग काउचबद्दल आपले मत व्यक्त केले होते. रकुलने म्हटले होते की, साउथ इंडस्ट्रीत कास्टिंग काउचसारखे प्रकार बघावयास मिळत नाहीत. रकुलच्या या वक्तव्यानंतर इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्रींनी तिच्यावर टीका केली होती. 

दरम्यान, श्री रेड्डीने आरोप करताना म्हटले की, कास्टिंग काउचच्या मुद्द्यावर सर्वच चुप्पी साधून आहेत. यामुळेच तिने हैदराबादमधील ‘जुबली हिल्स’ या पॉश परिसरात शोषणाच्या विरोधात फिल्म चॅँबर आॅफिसच्या बाहेर अर्धग्न आंदोलन केले. श्रीच्या या आंदोलनानंतर इंडस्ट्रीत एकच खळबळ उडाली आहे. 

Web Title: Mr. Reddy's claim, I sent my nude video and photo to many producers but got no work!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.