सिनेमा झुकतोय ओटीटी क्षेत्राकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 04:28 IST2020-01-01T04:26:40+5:302020-01-01T04:28:10+5:30

येत्या काही वर्षांत ओटीटी प्लॅटफॉर्मच्या वाढत्या जगामुळे सिनेमा हे क्षेत्रच ढवळून निघालेय. मनोरंजनाची व्याख्याच बदलली आहे.

Movies are leaning towards the OTT area | सिनेमा झुकतोय ओटीटी क्षेत्राकडे

सिनेमा झुकतोय ओटीटी क्षेत्राकडे

- अजय परचुरे

भारतीय चित्रपटसृष्टीला १०० हून जास्त वर्षे पूर्ण झाली आहेत. नवीन तंत्रज्ञान,टेक्नॉलॉजी आली आणि सिनेमाचा चेहरामोहराच बदलला. आता सिनेमा आता थेट मोबाइलमध्ये घुसलाय. येत्या काही वर्षांत ओटीटी प्लॅटफॉर्मच्या वाढत्या जगामुळे सिनेमा हे क्षेत्रच ढवळून निघालेय. मनोरंजनाची व्याख्याच बदलली आहे. आता सिनेमात आपला मुद्दा सेन्सॉरच्या कात्रीमुळे न मांडता येणारा तरुण फिल्ममेकर ओटीटी प्लॅटफॉर्मची कास धरू लागलाय. पूर्वीचा सिनेमा हा मानवी अंतर्मनाचे अथवा स्थितीची अभिव्यक्ती होता. तंत्रज्ञानाच्या क्रांतीने व डिजिटल माध्यमांनी स्थिती आता पूर्णत: बदलली आहे. पूर्वीचा सिनेमा हॉलमधील अंधाऱ्या गुहेत दिसणारा सिनेमा होता, आता हाच सिनेमा लख्ख प्रकाशातल्या टीव्ही, टॅबलेटसह मोबाइलवर लोक केव्हाही व कुठेही पाहतात.

स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या वाढत्या सुलभतेने भारतात ओटीटी क्षेत्राची झपाट्याने वाढ होते आहे. आणि याची लोकप्रियताही भारतात मोठ्या प्रमाणात वाढतेय. वाढणाºया लोकप्रियतेचा लाभ घेण्यासाठी आता सिनेक्षेत्रातील मंडळीही मोठ्या पडद्यावरून मोबाइलवर दिसणाºया अतिशय छोट्या पडद्यावर करोडोने पैसा गुंतवत आहेत. वेबसीरिज हा एक प्रकारचा सिनेमाच आहे. सिनेमाच्या बजेटप्रमाणेच यातसुद्धा निर्माते करोडो रुपयाचं बजेट खर्च करत आहेत. गुणवत्तेच्या बाबतीत मुख्य सिनेमात केल्या जाणाºया खर्चाइतकाच यातही पैसा गुंतविला जात आहे. सिनेमागृहात सिनेमा रिलीज करण्यापेक्षा मोठे मोठे निर्माते सध्या आपला सिनेमा थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा सपाटा लावत आहेत. ज्यात त्यांना सिनेमा थिएटरमध्ये रिलीज करून होणाºया नफ्यापेक्षा अधिकचा नफा होत आहे. त्यामुळे पुढच्या काही काळात मोठ्या बॅनरचे सिनेमे थिएटरमध्ये न लागता थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर आहे, त्या ठिकाणी बसून बघण्याचा काळही नजीक आला आहे.

१०० करोड कमावण्याचा ताण नाही
मुळात ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमांनी ३०० करोड कमावले की, ४०० करोड कमावले याचा निर्मात्यांना कोणताही ताण नाही. आपलं नाणं म्हणजेच आपला विषय खणखणीत वाजणारं असेल, तर देशभरातून लोक मोबाइलवरूनच आपल्या सिनेमाला किंवा वेबसीरिजला भरपूर प्रतिसाद देतात आणि त्यांची कमाईही सिनेमात मिळणाºया यशाच्या जवळपास जाणारी असते

Web Title: Movies are leaning towards the OTT area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.