चित्रपट आपटला पण तोरा कायम!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2016 18:58 IST2016-09-10T13:28:57+5:302016-09-10T18:58:57+5:30

आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘मोहेंजोदडो’ बॉक्सआॅफिसवर सडकून आपटला. या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी पूजा हेगडे हिच्यासाठी हा मोठा धक्का होता. ...

The movie will be destroyed, but it is always !! | चित्रपट आपटला पण तोरा कायम!!

चित्रपट आपटला पण तोरा कायम!!

ुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘मोहेंजोदडो’ बॉक्सआॅफिसवर सडकून आपटला. या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी पूजा हेगडे हिच्यासाठी हा मोठा धक्का होता. पण बाईसाहेबांना धक्का वगैरे काहीही बसलेला नाही. उलट पूजाचे नखरे पाहून अनेक जण अवाक झाले आहेत. अलीकडे पूजाला पुण्यात आयोजित ‘पुणे फेस्टिवल’साठी बोलवले गेले होते. यासाठी तिला भलीमोठी रक्कमही देण्यात आली होती. मात्र पुण्याला पोहोचताच पूजाने आयोजकांच्या नाकात दम आणून सोडला. या फेस्टिवलला शर्मिला टागोर, मल्लिका शेरावत आणि सूरज पांचोलीसारखे स्टार्सही होते. पूजाने या सगळ्यांसोबत स्टेज शेअर करावा,असे आयोजकांचे मत होते. पूजाने मात्र या सगळ्यांसोबत स्टेज शेअर करण्यास नकार देत आयोजकांशी चांगलीच हुज्जत घातली. दोन तासांपर्यंत तिने आयोजकांना अक्षरश: वेठीस धरले. ऐनकेन प्रकारे समजूत काढल्यानंतर पूजा स्टेजवर आली आणि सगळ्यांसोबत तिने स्टेज शेअरही केला. पण तिचे नखरे झेलता झेलता आयोजकांच्या नाकीनऊ आले.

Web Title: The movie will be destroyed, but it is always !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.