Mother'sDay : बाळाला स्तनपान करतानाचा ‘या’ अभिनेत्रीचा फोटो होतोय व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2018 20:48 IST2018-05-13T15:17:49+5:302018-05-13T20:48:44+5:30

आंतरराष्ट्रीय मातृत्व दिनानिमित्त बॉलिवूड कलाकारांनी आपल्या आईसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून आईप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. मात्र नुकतील ...

Mother's Day: Photo of 'this' actress is breastfeeding while breastfeeding the baby ... | Mother'sDay : बाळाला स्तनपान करतानाचा ‘या’ अभिनेत्रीचा फोटो होतोय व्हायरल...

Mother'sDay : बाळाला स्तनपान करतानाचा ‘या’ अभिनेत्रीचा फोटो होतोय व्हायरल...

तरराष्ट्रीय मातृत्व दिनानिमित्त बॉलिवूड कलाकारांनी आपल्या आईसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून आईप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. मात्र नुकतील आई झालेल्या एका अभिनेत्रीने या दिवसाच्या पूर्वसंध्येलाच ट्विटर अकाउंटवर आपल्या चिमुकल्याला स्तनपान करतानाचा फोटो शेअर केला. होय, हॉलिवूड अभिनेत्री, मॉडेल तथा टॉप शेफ होस्ट पद्मा लक्ष्मीने आपल्या बाळाला स्तनपान करतानाचा एक फोटो शेअर केला असून, तिचा हा फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. शिवाय नेटीझन्समध्ये तिच्या या फोटोवरून संमिश्र प्रतिक्रियाही दिल्या जात आहेत. 

पद्मा लक्ष्मीने तिच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केलेल्या या फोटोत ती एका हाताने मेकअप करताना दिसत आहे. त्याचबरोबर कडेवर असलेल्या आपल्या बाळाला स्तनपान करतानाही ती दिसत आहे. या फोटोवरून पद्मा लक्ष्मी महिलांना किती मल्टीटास्क करावे लागतात हे ती दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे. दरम्यान, हा फोटो सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत असून, त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.  



दरम्यान, पद्मा लक्ष्मीप्रमाणेच साउथ अभिनेत्री गिलू जोसेफ हिनेही मासिकासाठी स्तनपान करतानाचे फोटोशूट केले होते. अशाप्रकारचे फोटोशूट करण्याचे एकमेव कारण म्हणजे महिला कोणत्याही ठिकाणी आपल्या बाळाला स्तनपान करण्यासाठी स्वातंत्र आहेत, हेच सांगण्याचा यातून प्रयत्न केला गेला. गिलू जोसेफच्या या फोटोनंतर अनेक अभिनेत्रींनी स्तनपान करतानाचे फोटो शेअर केले आहेत. 

Web Title: Mother's Day: Photo of 'this' actress is breastfeeding while breastfeeding the baby ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.