मिलींद सोमणची प्रेयसी होती ही मॉडेल,'त्या' फोटोशूटमुळे आले होते चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2017 07:35 AM2017-11-04T07:35:57+5:302017-11-04T13:05:57+5:30

काही दिवसांपासून मॉडेल मिलिंद सोमणची वयाने लहान असलेल्या त्याच्या गर्लफ्रेंडसोबतची लव्ह स्टोरी सोशल मीडियावर चांगलीच गाजत आहे. या दोघांचे ...

The model was Milind Soman's favorite, 'That' was due to the photoshoot | मिलींद सोमणची प्रेयसी होती ही मॉडेल,'त्या' फोटोशूटमुळे आले होते चर्चेत

मिलींद सोमणची प्रेयसी होती ही मॉडेल,'त्या' फोटोशूटमुळे आले होते चर्चेत

googlenewsNext
ही दिवसांपासून मॉडेल मिलिंद सोमणची वयाने लहान असलेल्या त्याच्या गर्लफ्रेंडसोबतची लव्ह स्टोरी सोशल मीडियावर चांगलीच गाजत आहे. या दोघांचे एकत्र फिरतानाचे अनेक फोटोही  सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे यांची लव्हस्टोरीवर अनेक संमिश्र प्रतिक्रीयाही उमटल्याचे पाहायला मिळाले.याचबरोबर  सध्या मिलींद सोमनचा एक जुना फोटो व्हायरल झाला आहे.या फोटोत दिसणारी तरूणी दुसरी तिसरी कोणीही नसून सुपरमॉडेल मधू सप्रे.मिलींद आणि मधू यांनी पूर्णपणे नग्न अवस्थेत केवळ शूज आणि अंगावर अजगर घेऊन फोटोशूट केले होते. त्यावेळी या दोघांचेहे फोटोशूट प्रकरण खूप गाजले होते.हे फोटोशूट त्यांना चांगलेच महागात पडले होते. या एका फोटोशूटमुळे जाहिरातीविरोधात दोघांवर खटलाही दाखल करण्यात आला होता.मिलींद आणि मधू यांनी त्यांच्या करीअरची सुरुवात जवळपास एकत्रच  केली.  मॉडेलिंग इंडस्ट्रीत दोघंही प्रचलित आहेतच. त्याशिवाय मिलिंद आणि मधु यांच्या अफेअरच्या किस्सेही खूप जास्त गाजले. मिलिंद आणि मधु यांचा हा जुना फोटो व्हायरल होताच पुन्हा एकदा लव्हस्टोरीवर चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे.अनेक वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर या दोघांचे ब्रेकअपची त्यावेळी फार चर्चा झाली होती.ब्रेकअप झाल्यानंतरही मिलिंद मधुला विसरू शकला नव्हता. त्यामुळे एरव्ही उघडपणे न बोलणार मिलिंद ब्रेकअपनंतर मात्र मिलींद मधूच्या प्रेमात असल्याचे जाहिरपणे  कबुलीही दिली होती. मात्र मधुने निर्धार केल्याप्रमाणे ती मिलिंदजवळ पुन्हा परतलीच नाही. त्या लव्हस्टोरीला तिथेच पूर्णविराम लावत तिने इटालियन बिझनेसमनसोबत लग्न केले.आणि आता मधू इटलीतच वास्तव्यास आहे.

मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, मिलिंदची गर्लफ्रेंड अंकिता पेशाने एअरहोस्टेस आहे. मिलिंद सोमनने त्याच्या प्रेमाची ही कथा सोशल मीडियाच्या माध्यमातून जगजाहीर झाली. हे दोघे गेल्या वर्षाच्या आॅक्टोबर महिन्यांपासून एकमेकांना डेट करीत आहेत. मिलिंदने अंकिताबरोबरचे बरेचसे फोटो शेअर केले आहेत. मिलिंद अखेरीस ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटात झळकला होता. चित्रपटात त्याने अम्बाजी पंतची भूमिका साकारली होती. मिलिंद सध्या फिटनेस प्रमोटर आहे. १९ जुलै २०१६ मध्ये मिलिंदने ‘आयरमॅन’ स्पर्धेत यश प्राप्त केले होते. 

Web Title: The model was Milind Soman's favorite, 'That' was due to the photoshoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.