VIDEO : ‘मिस युनिव्हर्स 2021’ Harnaaz Sandhuचं गजब ट्रान्सफॉर्मेशन,  ट्रोलर्सची केली बोलती बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 01:53 PM2022-05-06T13:53:51+5:302022-05-06T13:54:44+5:30

Harnaaz Sandhu Transformation: ‘मिस युनिव्हर्स 2021’ हरनाज संधू गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. वाढत्या वजनामुळे तिला ट्रोल केलं जातेय. पण आता हरनाजने ट्रोलर्सची बोलती बंद केलीय. होय, नव्या व्हिडीओतील हरनाजचं गजब ट्रान्सफॉर्मेशन पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

Miss Universe 2021 harnaaz sandhu transformation in her new video | VIDEO : ‘मिस युनिव्हर्स 2021’ Harnaaz Sandhuचं गजब ट्रान्सफॉर्मेशन,  ट्रोलर्सची केली बोलती बंद

VIDEO : ‘मिस युनिव्हर्स 2021’ Harnaaz Sandhuचं गजब ट्रान्सफॉर्मेशन,  ट्रोलर्सची केली बोलती बंद

googlenewsNext

मिस युनिव्हर्स 2021’ हरनाज संधू (Harnaaz Sandhu) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. वाढत्या वजनामुळे तिला ट्रोल केलं जातेय. पण आता हरनाजने ट्रोलर्सची बोलती बंद केलीय. होय, नव्या व्हिडीओतील हरनाजचं गजब ट्रान्सफॉर्मेशन पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
हरनाजने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती लाल रंगाच्या आऊटफिटमध्ये मस्तानी अदा दाखवताना दिसतेय. हरनाजने थाई स्लीट गाऊन घातला आहे.

मिस यूनिव्हर्स 2021 चा किताब आपल्या नावे करणारी हरनाज संधूने भारताचं नाव जगभरात उंचावलं आहे. हरनाज संधूच्या डोक्यावर जेव्ह मुकूट ठेवण्यात आला तेव्हा तिच्या सुंदरतेचं कौतुक फक्त भारतातच नाही तर जगभरात झालं होतं.
हरनाज डिसेंबर 2021 मध्ये मिस यूनिव्हर्स बनली होती. तेव्हा तिच्या सौंदर्यासोबतच तिची फिटनेस आणि टोन्ड बॉडी पाहून फॅन्स तिच्या फिदा झाले होते.  पण  मिस यूनिव्हर्स बनल्यानंतर काही महिन्यातच हरनाजचं बदलेलं रूप पाहून फॅन्स हैराण झाले होते.
मिस यूनिव्हर्स बनल्यानंतर काही महिन्यातच हरनाजचं वजन प्रचंड वाढलं होतं. फिट अ‍ॅन्ड ग्लॅमरस हरनाज अगदी गोलू-मोलू दिसायला लागली होती.आहे.  असं काय झालं की, हरनाजचा लूक पूर्णपणे बदलला? असा प्रश्न तिला पाहून अनेकांना पडला होता.
लॅक्मे फॅशन वीकमध्ये हरनाज संधूनेही रॅम्प वॉक केला, तेव्हा तिला बघून सगळेच शॉक्ड झाले होते. यावरून हरनाज ट्रोलही झाली होती.

 हरनाजला आहे हा आजार
हरनाजचं वजन एकाएकी का वाढलं होतं, याला कारण होतं. मुळात हरनाजला Celiac हा आजार असून यामुळे तिचं वजन झपाट्यानं वाढतं. तिला जन्मापासूनच हा आजार असल्याचं तिनं स्वत: सांगितलं होतं. हा आजार असलेल्या व्यक्तिला विशिष्ट प्रकारच्या प्रोटीन्स व ग्लुटेनची अ‍ॅलर्जी असते. असा आजार असलेली व्यक्ती गहू, बार्ली किंवा जव यांच्यापासून तयार केलेले पदार्थ पचवू शकत नाहीत. परिणमाी अन्नाचे पचन न झाल्यानं या व्यक्ती एकतर बारीक होतात किंवा जाड होता. हा आजार अनुवंशिक असून त्याचे प्रमाण महिलांमध्ये जास्त आहे.

Web Title: Miss Universe 2021 harnaaz sandhu transformation in her new video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.