पैशांसाठी गर्लफ्रेन्ड अंकिताने मिलिंद सोमणला दिला धोका! वाचा, काय आहे सत्य!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2018 12:08 IST2018-04-19T06:35:26+5:302018-04-19T12:08:52+5:30
अभिनेता मिलिंद सोमणने स्वत:पेक्षा अर्ध्या वयाची गर्लफ्रेन्ड अंकिता कोनवार हिच्यासोबत साखरपुडा केल्याची बातमी अगदी अलीकडे येऊन केली. अर्थात अद्याप ...
.jpg)
पैशांसाठी गर्लफ्रेन्ड अंकिताने मिलिंद सोमणला दिला धोका! वाचा, काय आहे सत्य!!
अ िनेता मिलिंद सोमणने स्वत:पेक्षा अर्ध्या वयाची गर्लफ्रेन्ड अंकिता कोनवार हिच्यासोबत साखरपुडा केल्याची बातमी अगदी अलीकडे येऊन केली. अर्थात अद्याप मिलिंदने या बातमीला दुजोरा दिला नाही तसाच नकारही दिला नाही. साखरपुड्याच्या बातमीनंतर लवकरच हे जोडपे लग्न करणार अशीही चर्चा रंगली. पण अचानक या लव्हस्टोरीत एक अनपेक्षित वळण आले. होय, लग्नाआधीच मिलिंद व अंकिताच्या ब्रेकअप झाल्याची बातमी धडकली. अंकिताच्या हाती एक जॅकपॉट लागला आणि तिने आपल्यापेक्षा अर्ध्या वयाच्या मिलिंदला बाय बाय केले, असे सांगितले जाऊ लागले. होय, अंकिताला आॅनलाईन कसीनो खेळायचा छंद आहे. याच खेळात अंकिताने भली मोठी रक्कम जिंकली आणि यानंतर ती म्हणे मिलिंदला टाळू लागलीयं. मिलिंदचे फोन घेणेही तिने बंद केले, अशी बातमी कानोकानी झाली. अंकिता फ्लाईट अटेंडेंटची नोकरी करते आणि या नोकरीत ती २६ हजार रूपये महिला कमावते. खाली वेळात ती आॅनलाईन कॅसीनो खेळणे पसंत करते. येथूनच अंकिताच्या हाती एक मोठे घबाड लागले आणि तिने मिलिंदला डंप केल्याच्या या चर्चेने सगळ्यांनाच धक्का बसला. पण शेवटी ही बातमी स्वत: अंकितानेच खोटी ठरवली.
![]()
होय, क्षणाचाही विलंब न करता, अंकिताने इन्स्टाग्रामवर स्वत:चा व मिलिंदचा एक रोमॅन्टिक फोटो शेअर केला. सोबत एक रोमॅन्टिक कॅप्शनही लिहिले. earthy_5The best thing to spend on your relationship is time, conversation, understanding and honesty, असे तिने लिहिले. अंकिताच्या या पोस्टवरून तिच्यात व मिलिंदमध्ये सगळे काही ठीक आहे, याचा पुरावा अखेर मिळाला. आता सगळे काही ठिक असले तर लवकरच दोघांच्या लग्नाची बातमीही लवकरचं मिळेल, अशी अपेक्षा करूयात.
ALSO READ : मिलिंद सोमणने केला साखरपुडा! गर्लफ्रेन्डच्या बोटात दिसली अंगठी!!
अंकिता तूर्तास दिल्लीत राहते. अंकिताला हिंदी, बांगला, आसामी याशिवाय फ्रेंच आणि इंग्रजी या भाषा येतात. मुव्हीज पाहणे आणि स्वीमिंग तिचे छंद आहेत. तिला भटकायलाही जाम आवडते. कदाचित त्याचमुळे वयात ३० वर्षांचा फरक असूनही मिलिंद व तिची केमिस्ट्री इतकी जबरदस्त आहे.
अंकिताने २०१५ मध्ये मिलिंदसोबत १० हजार किमीची मॅराथॉन पूर्ण केली होती. मिलिंद प्रत्येक पोस्टमध्ये तिचा उल्लेख श्रीमती असा करतो.
२००६ मध्ये मिलिंद सोमणने फ्रेंच अभिनेत्री मिलेन जम्पनोइ हिच्यासोबत लग्न केले होते. अर्थात हे नाते फार काळ टिकले नाही. मिलिंद ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटात अखेरचा दिसला होता. सध्या मिलिंद फिटनेस प्रमोटर आहे. १९ जुलै २०१६ रोजी मिलिंदने आयर्न मॅन कॉन्टेस्ट जिंकले होते.३.८ किमी स्विमींग, १८०.२ किमी सायकलिंग आणि ४२.२ किमी रनिंग १५ तास १९ मिनिटांत पूर्ण करत त्याने हा किताब आपल्या नावावर केला होता.