दीपिका पादुकोण बनली ऑस्कर अॅकेडमीची मेंबर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2017 07:16 AM2017-07-20T07:16:56+5:302017-07-20T13:01:16+5:30

दीपिका पादुकोणला नुकतेच अॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर ऑफ एंड साइंसेज (एएमपीएएस) ची सदस्य बनवण्यात आले आहे. या गोष्टीची माहिती ...

Member of Oscar Academy, Deepika Padukone | दीपिका पादुकोण बनली ऑस्कर अॅकेडमीची मेंबर

दीपिका पादुकोण बनली ऑस्कर अॅकेडमीची मेंबर

googlenewsNext
पिका पादुकोणला नुकतेच अॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर ऑफ एंड साइंसेज (एएमपीएएस) ची सदस्य बनवण्यात आले आहे. या गोष्टीची माहिती खुद्द दीपिकाने आपल्या ट्विटर अकांऊटवरुन तिच्या फॅन्सना दिली. दीपिकाला मिळालेल्या या संधीमुळे ती स्वत:ला सन्मानित झाल्याचे समजते आहे तिने आपला हा आनंद ट्वीटरवरुन व्यक्त केला आहे. दीपिकाने व्हिन डिझेलसोबत xxx द रिटर्न ऑफ झेंडर केज या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. दीपिकासह प्रियांका चोप्रा पण 2017च्या अॅकेडमी क्लासमध्ये दिसणार आहे. दीपिका आणि प्रियांकासोबत अमिताभ बच्चन. आमिर खान, ऐश्वर्या राय बच्चन, सलमान खान यांनासुद्धा या अॅकडेमीमध्ये सहभागी होण्याचे तसेच ऑस्करमध्ये नामांकनासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.    

ALSO READ : दीपिका पादुकोणचा हा ‘रॉयल लूक’ तुम्हाला करून देईल परिकथांची आठवण! 

दीपिका सध्या पद्मावतीच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात ती राणी पद्मावतीची भूमिका साकारत आहे. अल्लाउद्दीन खिलाजाच्या भूमिकेत रणवीर सिंग दिसणार आहे तर रवल रतन सिंग याच्या भूमिकेत शाहिद कपूर झळकणार आहे. 17 नोव्हेंबर 2017ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. पद्मावतीनंतर दीपिकाचे मानधन ही चांगलेच वधारले आहे. पद्मावतीसाठी तिने 7 कोटी आकारले आहेत. यानंतर दीपिका विशाल भारव्दाज यांच्या चित्रपटात झळकणार आहे. आता दीपिकाने चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी निर्मांत्यांकडे 12 कोटींचे मानधन मागितले आहे. दीपिकाचे नाव फोर्ब्सच्या यादीत भारतातील अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये सगळ्यात वर आहे. दीपिका टेनिस खेळाडू नोवाक जोकोविचला टेड करत असल्याची चर्चा मध्यांतरी झाली होती. खुद्द जोकोविचचे माजी प्रेमिका व सर्बियाची पॉप स्टार नताशा बेकवेलेक हिने हा दावा केला होता.. 

Web Title: Member of Oscar Academy, Deepika Padukone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.