Sharad Kelkar VIDEO : -अन् भर पार्टीत शरद केळकर झाला रोमॅन्टिक, पत्नीनं केलं किस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 11:24 AM2023-01-17T11:24:40+5:302023-01-17T11:36:55+5:30

Sharad Kelkar : होय, शरद केळकर व त्याची पत्नी किर्तीचा एक रोमॅन्टिक व्हिडीओ व्हायरल होतोय...या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत....

Marathi actor Sharad Kelkar Wife Keerti Gaekwad Party Video Viral | Sharad Kelkar VIDEO : -अन् भर पार्टीत शरद केळकर झाला रोमॅन्टिक, पत्नीनं केलं किस

Sharad Kelkar VIDEO : -अन् भर पार्टीत शरद केळकर झाला रोमॅन्टिक, पत्नीनं केलं किस

googlenewsNext

मराठमोळा शरद केळकर (Sharad Kelkar ) याला कोण ओळखत नाही? शरदने छोटा पडदा गाजवलाच पण बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. डिजिटल प्लॅटफॉर्मवरही त्याचा दबदबा आहेच. पण इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. डोक्यावर कर्जाचा डोंगर होता आणि बँक बॅलेन्स म्हणाल तर सगळा ठणठणाट होता. अशा परिस्थितीतून शरद बाहेर आला, इतकंच नाही तर त्याने इंडस्ट्रीत दबदबा निर्माण केला. आज शरद केळकरचे जगाच्या पाठीवर असंख्य चाहते आहेत. तूर्तास काय तर शरद व त्याची पत्नी किर्तीचा एक रोमॅन्टिक व्हिडीओ व्हायरल होतोय. होय,नुकतंच शरदने पत्नी किर्तीबरोबरचा एक व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

बॅकग्राऊंडमध्ये तू मान मेरी जान हे गाणं वाजतंय आणि शरद व किर्ती एकमेकांत हरवले आहेत. मैं तुझे जाने ना दुंगा... मैं तुझको अपनी बाहों में छुपा के रखुंगा..., असे गीताचे बोल आहेत. त्यानुसार, शरद किर्तीला मिठीत कवटाळतो, तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करतो.शरदचं हे प्रेम पाहून किर्ती त्याला किस करते.  शरद व किर्तीच्या या व्हिडीओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. शरद व किर्तीचं एकमेकांवर किती प्रेम आहे, हे या व्हिडीओतून दिसत आहे.    या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. तुम्हा दोघांचा हा आत्तापर्यंतचा सर्वात सुंदर व्हिडीओ आहे. ब्युटिफुल कपल, तुम्हाला कुणाची दृष्ट ना लागो, अशा कमेंट करत चाहत्यांनी या जोडप्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

शरद केळकर आणि किर्ती गायकवाड यांनी  ३ जून, २००५ रोजी लग्नगाठ बांधली.  त्यांना एक मुलगी असून तिचे नाव किशा आहे. किर्ती आणि शरदने ‘सात फेरे’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. या मालिकेच्या सेटवर दोघांमध्ये प्रेम फुलू लागलं. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. किर्ती व शरद नेहमी एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. 
किर्तीने सात फेरे, छोटी बहू, ससूराल सिमर का या मालिकेत काम केले आहे. नच बलिए या रिअ‍ॅलिटी डान्स शोमध्येही ती झळकली आहे.

शरद केळकरने मराठी व हिंदी चित्रपटात विविध भूमिका केल्या आहेत. ‘तान्हाजी- द अनसंग वॉरियर’ सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शरद झळकला होता. त्याने साकारलेल्या या भूमिकेने  रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला होता. त्यानंतर लक्ष्मी बॉम्ब चित्रपटात त्याने साकारलेल्या तृतीयपंथियाची भूमिका देखील चाहत्यांना खूप भावली होती. 

Web Title: Marathi actor Sharad Kelkar Wife Keerti Gaekwad Party Video Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.