मलाइका अरोराचे अरबाज खानसोबतचे नाते तुटले; बिझनेससोबतचे नव्हे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2017 19:30 IST2017-04-18T14:00:34+5:302017-04-18T19:30:34+5:30

बॉलिवूडची आयटम गर्ल मलाइका अरोरा हिचे भलेही पती अरबाज खान याच्याशी नातेसंबंध बिघडले असले तरी, बिझनेसबाबतचे तिचे नाते आजही ...

Malaika Arora breaks her relationship with Arbaaz Khan; Not with business! | मलाइका अरोराचे अरबाज खानसोबतचे नाते तुटले; बिझनेससोबतचे नव्हे!

मलाइका अरोराचे अरबाज खानसोबतचे नाते तुटले; बिझनेससोबतचे नव्हे!

लिवूडची आयटम गर्ल मलाइका अरोरा हिचे भलेही पती अरबाज खान याच्याशी नातेसंबंध बिघडले असले तरी, बिझनेसबाबतचे तिचे नाते आजही कायम आहे. एका मुलाखतीत खुलासा करताना मलाइकाने म्हटले की, ती आजही सलमान खान स्टारर ‘दबंग-३’ची निर्माता आहे. मलाइकाच्या या खुलाशामुळे अरबाज कितपत समाधानी असेल, हे सांगणे मात्र अवघडच म्हणावे लागले. 

होय, एका अवॉर्ड शोदरम्यान जेव्हा मलाइकाला माध्यमांच्या प्रतिनिधींनी घेरले तेव्हा तिने याविषयी बोलणे टाळले. मात्र सूत्रानुसार ती ‘दबंग-३’मध्येदेखील एक आयटम सॉँग करणार असल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी अशा बातम्या समोर आल्या होत्या की, मलाइकाने ‘दबंग-३’च्या निर्माता पदापासून स्वत:ची सुटका करून घेतली आहे, परंतु आता येत असलेल्या माहितीनुसार मलाइका आजही या सीरिजची निर्माता आहे. 



गेल्या वर्षभरापासून मलाइका पती अरबाज खानपासून विभक्त राहत आहे. दोघांनीही घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज केला असून, आता हे दोघे विभक्त होण्याच्या तयारीत आहे. मात्र बºयाचदा असेही बघावयास आले आहे की, हे दोघे लंच, डिनरसाठी एकत्र आले आहेत. त्यामुळे हे दोघे पुन्हा एकदा एकत्र तर येणार नाहीत ना? अशी चर्चा मध्यंतरीच्या काळात रंगली होती. 

नुकतेच मुंबई येथील ‘कॉर्नर हाउस’ या प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये एका पार्टीचे आयोजन केले होते. ज्याठिकाणी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. या पार्टीत अर्जुन कपूर आणि मलाइका एकत्र पोहोचले होते. आतापर्यंत हे दोघेही माध्यमांपासून नेहमीच दूर पळत आले आहेत. परंतु यावेळेस दोघे वेगळ्याच मुडमध्ये बघावयास मिळालेत. मलाइका आणि अर्जुनच्या जवळीकतेमुळेच अरबाज-मलाइकाच्या नात्यात दरार निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. 

Web Title: Malaika Arora breaks her relationship with Arbaaz Khan; Not with business!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.