मलायका अरोरा आणि अरबाज खान एअरपोर्टवर दिसले एकत्र; युजर्स म्हणाले - 'भांडताय कशाला दोघं?'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 02:22 PM2022-02-07T14:22:57+5:302022-02-07T14:23:19+5:30

मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अरबाज खान (Arbaaz Khan)चा लेटेस्ट व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

Malaika Arora and Arbaaz Khan appeared together at the airport; Users say - 'Why are you two arguing?' | मलायका अरोरा आणि अरबाज खान एअरपोर्टवर दिसले एकत्र; युजर्स म्हणाले - 'भांडताय कशाला दोघं?'

मलायका अरोरा आणि अरबाज खान एअरपोर्टवर दिसले एकत्र; युजर्स म्हणाले - 'भांडताय कशाला दोघं?'

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता अरबाज खान त्याची एक्स वाइफ मलायका अरोरामुळे चर्चेत येत असतो. घटस्फोटानंतरही ते दोघे बऱ्याचदा एकत्र दिसतात. नुकतेच पुन्हा एकदा दोघेही विमानतळावर एकत्र दिसले आणि त्यांच्यासोबत त्यांचा मुलगादेखील पाहायला मिळाला.

मलायका अरोरा आणि अरबाज खान एकमेकांपासून वेगळे झाले असले तरी त्यांचा मुलगा अरहानसाठी ते अजूनही एकत्र आहेत. दोघेही आपल्या आयुष्यात कितीही व्यस्त असले तरी जेव्हा मुलाचा प्रश्न येतो तेव्हा ते एकत्र येतात. मलायका आणि अरबाजचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये ते त्यांचा मुलगा अरहान खानला सोडण्यासाठी मुंबई विमानतळावर पोहोचले होते. या व्हिडिओमध्ये मलायका, अरबाज आणि त्यांचा मुलगा अरहान एका फ्रेममध्ये दिसत आहेत.

विरल भयानीच्या पेजवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये मलायका अरोरा आणि अरबाज खान त्यांच्या मुलासोबत विमानतळावर दिसत आहेत. या दरम्यान प्रत्येकाच्या तोंडावर मास्क आहे. व्हिडिओमध्ये अरबाज आणि मलायका एकमेकांशी बोलतानाही दिसत आहेत. व्हिडिओमध्ये अरहानही त्याच्या मित्रांना भेटताना दिसत आहे. अल्पावधीतच या पोस्टवर लाखो लाईक्स आले आहेत, ज्यावर लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.

युजर्सने दिल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया

व्हिडिओवर कमेंट करताना एका सोशल मीडिया यूजरने लिहिले, 'तुम्ही का भांडत आहात' तर दुसऱ्याने लिहिले की, 'अर्जुनपेक्षा मलायका अरबाजसोबत चांगली दिसते'. तर आणखी एकाने लिहिले की, 'घटस्फोटानंतरही मुलं त्यांच्या आई-वडिलांसाठी अनमोल भेटवस्तू असतात, जे दोघांमधील नातं टिकवून ठेवतात'. अशा अनेक प्रतिक्रिया या व्हिडिओवर आल्या आहेत. अरबाज खानपासून वेगळे झाल्यानंतर मलायका अरोरा सध्या बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे.

Web Title: Malaika Arora and Arbaaz Khan appeared together at the airport; Users say - 'Why are you two arguing?'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.