लग्नाच्या दिवशी श्रीराम नेनेंसमोर उघड झालं होतं माधुरी दीक्षितचं मोठं रहस्य, बिग बी आले नसते तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 10:20 AM2023-11-24T10:20:41+5:302023-11-24T10:21:09+5:30

Madhuri Dixit : लग्नापूर्वी माधुरी दीक्षितचे पती श्रीराम नेने यांना तिच्याबद्दलचे एक मोठे रहस्य माहित नव्हते. अमिताभ बच्चन यांच्यामुळे लग्नाच्या दिवशी हे गुपित उघड झाले.

Madhuri Dixit's big secret was revealed in front of Sriram Nene on the day of the wedding, if Amitabh Bachchan had not come... | लग्नाच्या दिवशी श्रीराम नेनेंसमोर उघड झालं होतं माधुरी दीक्षितचं मोठं रहस्य, बिग बी आले नसते तर...

लग्नाच्या दिवशी श्रीराम नेनेंसमोर उघड झालं होतं माधुरी दीक्षितचं मोठं रहस्य, बिग बी आले नसते तर...

बॉलिवूड सुपरस्टार माधुरी दीक्षित(Madhuri Dixit)ला कोण ओळखत नाही? तिचे नाव बॉलिवूडमध्ये एक ब्रँड बनले, तिच्या नावावर चित्रपट बनत असत. माधुरीला पाहण्यासाठी चाहते थिएटरमध्ये रांगा लावायचे. बॉलिवूडमध्ये उत्कृष्ट चित्रपट देणाऱ्या माधुरीचे नाव प्रत्येक तरुणाला माहीत आहे, परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की माधुरीचे पती डॉ.श्रीराम नेने हे माधुरीला ओळखत नव्हते. होय, माधुरी दीक्षितसोबतच्या लग्नानंतर डॉ. नेने यांच्यासमोर एक गुपित उघड झाले होते, जे जाणून त्यांना धक्काच बसला होता. 

माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने हे यूएसस्थित हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी सर्जन आहेत. माधुरीची डॉक्टर नेनेंशी पहिली भेट अमेरिकेतच झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, माधुरी दीक्षितचा भाऊ अजित दीक्षितच्या एका पार्टीत डॉ. नेने आणि माधुरी दीक्षित पहिल्यांदा भेटले होते. यानंतर हळूहळू माधुरी आणि नेने एकमेकांना आवडू लागले.

डॉ. श्रीराम नेनेंना माहित नव्हती ही गोष्ट

माधुरीने स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते की, माधुरीने चित्रपटात काम केले आहे, याची डॉ. नेने यांना कल्पना नव्हती. ती त्यांना सामान्य मुलीसारखी भेटली. माधुरीला ही गोष्ट आवडली की डॉक्टर नेनेंना ती सामान्य व्यक्ती म्हणून आवडू लागली होती. माधुरी आणि डॉ. नेने यांचा लग्न १७ ऑक्टोबर, १९९९ रोजी अमेरिकेत केवळ कुटुंबीयांच्या उपस्थितीत झाला. मात्र नंतर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. माधुरी दीक्षितच्या लग्नाचे वृत्त ऐकून बॉलिवूडमधील सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्नाच्या रिसेप्शनला उपस्थित राहिलेल्या बड्या बॉलिवूड स्टार्सपैकी डॉ. नेने फक्त सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनाच ओळखू शकले आणि माधुरी ही एक लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री आहे हे जाणून त्यांना आश्चर्य वाटले.

Web Title: Madhuri Dixit's big secret was revealed in front of Sriram Nene on the day of the wedding, if Amitabh Bachchan had not come...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.