मधुर भांडरकर यांच्या 'चांदनी बार'चा सीक्वल येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2018 14:06 IST2018-05-15T08:36:02+5:302018-05-15T14:06:02+5:30
'चांदनी बार' चित्रपट रिलीज होऊन 17 वर्षे झाली. तब्बूच्या काही दमदार चित्रपटांपैकी तो एक आहे. दिग्दर्शक मधुर भंडारकर यांना ...

मधुर भांडरकर यांच्या 'चांदनी बार'चा सीक्वल येणार
' ;चांदनी बार' चित्रपट रिलीज होऊन 17 वर्षे झाली. तब्बूच्या काही दमदार चित्रपटांपैकी तो एक आहे. दिग्दर्शक मधुर भंडारकर यांना या चित्रपटासाठी नॅशनल अवॉर्ड मिळाले होते. तब्बूलादेखील चांदनीमधील अभिनयासाठी नॅशनल अवॉर्ड मिळाले होते. या चित्रपटात तब्बूने साकारलेल्या भूमिकेचे प्रेक्षकांबरोबरच परीक्षकांकडून देखील कौतुक करण्यात आले होते. तब्बूच्या अभिनयाची एक वेगळीच छट्टा याठिकाणी दिसली होती. या चित्रपटासोबतट तब्बूचे नाव काही मोजक्या अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये देखील सामिल झाले होते ज्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपट हिरो नसताना चित्रपट हिट केले आहेत. चांदनी बार हा चित्रपट बारबालाच्या आयुष्यावर आधारित होता. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाचा सीक्वल तयार करण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
मीडिया रिपोर्टनुसार मधुर भंडारकर पुन्हा एकदा चांदनी बारचा सीक्वल बनवण्याच्या तयारीत आहे. 17 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. हा चित्रपट मधुर भंडारकर यांच्या करिअरचा टर्निंग ठरला. 'चांदनी बार'च्या सीक्वलची निर्मिती शैलेश आर सिंग करणार आहे. शैलेशने याबाबत सांगितले की, मधुरसोबत पुन्हा एकदा काम करण्यास उत्सुक आहे. यावेळी चित्रपटाची कथा 2005 मध्ये डान्स बारवर लावण्यात आलेल्या बंदीभवती फिरणारी आहे. मिळालेल्या माहितीनुसार मधुरने यावर आपले रिसर्चदेखील पूर्ण केले आहे. मधुर स्क्रिप्टावर फायनल कान करतो आहे. यानंतर तो चित्रपटातील कास्टिंगवर काम करायला घेणार आहे. या चित्रपटाची शूटिंग वर्षाच्या शेवटपर्यंत सुरु होऊ शकते. तब्बू सध्या आपला आगामी चित्रपट रॉम-कॉमच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा एक रोमाँटिक कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आकिव अली करतो आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून तब्बू अनेक वर्षांनंतर जेमी शेरगिलसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.