पाहा :​‘जॉली एलएलबी2’मधील अक्षयचा लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2016 19:10 IST2016-07-18T13:40:50+5:302016-07-18T19:10:50+5:30

‘जॉली एलएलबी’मधला अर्शद वारसी आठवतोय? नक्कीच आठवत असणार. कारण ‘जॉली एलएलबी’ त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट होता. विनोद, दु:ख, वेदना ...

Look: Look at the Jolly LLB2 | पाहा :​‘जॉली एलएलबी2’मधील अक्षयचा लूक

पाहा :​‘जॉली एलएलबी2’मधील अक्षयचा लूक

ॉली एलएलबी’मधला अर्शद वारसी आठवतोय? नक्कीच आठवत असणार. कारण ‘जॉली एलएलबी’ त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट होता. विनोद, दु:ख, वेदना सगळे काही यात होते. याच चित्रपटाचा सिक्वल येतोय आणि त्यात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. ‘जॉली एलएलबी2’मध्ये अक्षयचा लूक कसा राहणार, याबाबत उत्सूकता होतीच. ही उत्सूकता सध्या तरी शमली आहे. कारण अक्षयने या चित्रपटातील त्याचा लूक आज जारी केला. ‘



जॉली एलएलबी’मध्ये अर्शदने जगदीश त्यागी उर्फ जॉली या संघर्षरत वकीलाची भूमिका साकारली होती. समीक्षकांनी अर्शदच्या या भूमिकेचे चांगलेच कौतुक केले होते. आता ‘जॉली एलएलबी2’मध्ये अर्शदच्या जागेवर अक्षय दिसणार आहे. या भूमिकेसाठी अक्षयने ४२ कोटी रुपए फीस घेतल्याचे कळते. विशेष म्हणजे या चित्रपटाचे एकूण बजेट ६२ कोटी आहे. चित्रपटाचे शूटींग ४२ दिवस चालणार आहे. म्हणजेच एका दिवसासाठी अक्षयने १ कोटी फीस घेतली आहे. आता यानंतर ‘जॉली एलएलबी2’मधील आपल्या भूमिकेला अक्षय कसा न्याय देतो, ते बघूयात!


Web Title: Look: Look at the Jolly LLB2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.