​पाहा, ‘परमाणु : द स्टोरी आॅफ पोखरण’’चा फर्स्ट लूक!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2017 06:30 AM2017-08-14T06:30:56+5:302017-08-14T12:09:16+5:30

जॉन अब्राहम दीर्घकाळापासून मोठ्या पडद्यावर दिसलेला नाही. पण आता जॉनला पडद्यावर पाहण्यासाठी आतूर असलेल्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ...

Look, First Look of 'Atom: The Story of Pokhran'! | ​पाहा, ‘परमाणु : द स्टोरी आॅफ पोखरण’’चा फर्स्ट लूक!

​पाहा, ‘परमाणु : द स्टोरी आॅफ पोखरण’’चा फर्स्ट लूक!

googlenewsNext
न अब्राहम दीर्घकाळापासून मोठ्या पडद्यावर दिसलेला नाही. पण आता जॉनला पडद्यावर पाहण्यासाठी आतूर असलेल्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, लवकरच जॉन अब्राहमची मुख्य भूमिका असलेला ‘परमाणु : द स्टोरी आॅफ पोखरण’ रिलीज होणार आहे. या चित्रपटाबद्दल आधीही अनेक चर्चा आपण ऐकल्यात. तूर्तास या चित्रपटा’चा फर्स्ट लूक जारी करण्यात आला आहे. 
 


















यात जॉन एका वेगळ्यात अंदाजात दिसतोय. होय, तो यात धावताना दिसतोय. आता तो जॉगिंग करतोय की पळतोय, हे मात्र स्पष्ट झालेले नाही. हे पोस्टर लक्षपूर्वक बघितले असता, मागे तुम्हाला मिल्ट्री कॅम्प दिसेल. एकंदर काय तर ‘परमाणु : द स्टोरी आॅफ पोखरण’चा हा फर्स्ट लूक काहीसा कन्फ्युज करणारा आहे. म्हणजेच, जॉन यात शास्त्रज्ञ आहे की लष्कराचा अधिकारी, हे यावरून स्पष्ट होत नाही. यापूर्वीही या चित्रपटाचे एक पोस्टर रिलीज करण्यात आले होते. त्यात एका नकाशासोबत जॉनची झलक पाहायला मिळाली होती.
१ आणि १३ मे १९९८ रोजी पोखरण येथे झालेल्या आण्विक चाचण्यांच्या स्मृती ताज्या करणाºया या चित्रपटात जॉन अब्राहम, डायना पेन्टी आणि बोमन इराणी अशी स्टारकास्ट आहे. अभिषेक शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे, सैविन कदरोस आणि संयुक्ता चावला शेख यांनी. या दोघांनी याआधी ‘नीरजा’ची पटकथा लिहिली होती. ११ मे १९९८ रोजी दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांनी राजस्थानातील पोखरण येथे एकाच वेळी ३ अणुस्फोट घडवून आणलेत गेले होते. यानंतर १३ मे १९९८ रोजी पुन्हा दोन अणुस्फोट घडवून आणले गेले होते. यास ‘आॅपरेशन शक्ती’ या नावाने ओळखले जाते.डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या देखरेखीखाली  या चाचण्या झाल्या होत्या. खरे तर भारताने अलिप्तवादी धोरणाचा स्वीकार केला आहे. जगात शांतता निर्माण व्हावी यासाठी भारत नेहमीच प्रयत्नशील राहिला आहे. मात्र १९६२ च्या चीन आक्रमणानंतर भारताने लष्करीदृष्ट्या सक्षम होण्यासाठी, आपली संरक्षणसिद्धता जगाला दर्शविण्यासाठी १९७४ व १९९८ मध्ये पोखरण येथे अणुचाचण्या केल्या होत्या.

Web Title: Look, First Look of 'Atom: The Story of Pokhran'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.