पाहा : ‘31st October’ चा ट्रेलर !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2016 21:51 IST2016-08-31T13:50:38+5:302016-08-31T21:51:28+5:30
देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या आणि त्यानंतरच्या घडामोडींवर आधारित ‘31st October’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सोहा अली खान आणि वीर दास यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला.

पाहा : ‘31st October’ चा ट्रेलर !
द शाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या आणि त्यानंतरच्या घडामोडींवर आधारित ‘31st October’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सोहा अली खान आणि वीर दास यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला. दोन शिख अंगरक्षकांनी इंदिरा गांधी यांची हत्या केली होती. या हत्येनंतरच्या २४ ते ३६ तासांत एका शिख कुटुंबाला कुठल्या स्थितीतून जावे लागले, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. चार महिन्यांची प्रतीक्षा आणि नऊ कट्सनंतर सेन्सॉर बोडार्ने या चित्रपटास हिरवा कंदील दिला. हिंसा आणि रक्तपात दाखवणारे चित्रपटातील अनेक दृश्ये कापण्यात आलीत. हे दृश्ये विशेष जाती-धर्माच्या लोकांच्या भावना दुखावू शकतात, असे सेन्सॉर बोडार्चे मत होते. त्यामुळे ही दृश्ये एडिट करण्यात आली. तेव्हा बघा तर ‘31st October’चा ट्रेलर!