ट्विंकल घेऊन येणार ‘द लिजेंड आॅफ लक्ष्मी प्रसाद’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 12:01 IST2016-10-13T15:14:27+5:302016-10-17T12:01:32+5:30

बॉलिवूड अभिनेत्री ते फॅशन डिझायनर, लेखिका व स्तंभलेखक म्हणून ख्याती मिळविणारी व अभिनेता अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना आपल्या नव्या ...

'The Legend of Laxmi Prasad' will come with twinkle | ट्विंकल घेऊन येणार ‘द लिजेंड आॅफ लक्ष्मी प्रसाद’

ट्विंकल घेऊन येणार ‘द लिजेंड आॅफ लक्ष्मी प्रसाद’

ong>बॉलिवूड अभिनेत्री ते फॅशन डिझायनर, लेखिका व स्तंभलेखक म्हणून ख्याती मिळविणारी व अभिनेता अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना आपल्या नव्या पुस्तकातून भेटीला येणार आहे.  तिच्या या नव्या पुस्तकाचे नाव ‘द लिजेंड आॅफ लक्ष्मी प्रसाद’ असे असेल. याबाबतची घोषना तिने ट्विटरहून नुकतीच केली. 

गेल्या वर्षी ‘मिसेस फनीबोन्स’ या विनोदी पुस्तकाची लेखिका म्हणून ट्विंकल खन्ना सर्वांसमोर आली होती. हे पुस्तक बेस्टसेलर ठरले होते. या पुस्तकातील विनोदी किस्स्यांनी चांगलीच प्रसिद्धी मिळविली होती. आता पुन्हा ती ‘द लिजेंड आॅफ लक्ष्मी प्रसाद’मधून वाचकांना हसविणार आहे. या पुस्तकासाठी आॅनलाईन बुकिंग अनेक वेबसाईट्सवर सुरू झाली असल्याचे ट्विट तिने केलेय. 

My new book of stories that will hopefully make you laugh a lot and sigh a little. #TheLegendOfLakshmiPrasadpic.twitter.com/yCnn53xszV— Twinkle Khanna (@mrsfunnybones) October 12, 2016}}}} ">http://

}}}} ">My new book of stories that will hopefully make you laugh a lot and sigh a little. #TheLegendOfLakshmiPrasadpic.twitter.com/yCnn53xszV— Twinkle Khanna (@mrsfunnybones) October 12, 2016

मागील वर्षी मिसेस फनीबोन्स या पुस्तकाने चांगलीच प्रसिद्धी मिळविली होती. मिसेस फनीबोन्सच्या प्रकाशनासाठी आमिर खान उपस्थित होता. आता ‘द लिजेंड आॅफ लक्ष्मी प्रसाद’चे प्रकाशन कोण करणार अन् लक्ष्मी कोणत्या विनोदी किस्स्यांचे खुलासे करणार हे लवकरच कळेल.

Web Title: 'The Legend of Laxmi Prasad' will come with twinkle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.