​जाणून घ्या आता काय करतेय आशिकी फेम अन्नू अग्रवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 17:16 IST2017-08-17T11:46:36+5:302017-08-17T17:16:36+5:30

अन्नू अग्रवालने एक मॉडेल म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. काही मॉडलिंग असाइनमेंट केल्यानंतर बहने या मालिकेत काम करण्याची तिला ...

Learn what Ashishi Fame Annu Agarwal is doing now | ​जाणून घ्या आता काय करतेय आशिकी फेम अन्नू अग्रवाल

​जाणून घ्या आता काय करतेय आशिकी फेम अन्नू अग्रवाल

्नू अग्रवालने एक मॉडेल म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. काही मॉडलिंग असाइनमेंट केल्यानंतर बहने या मालिकेत काम करण्याची तिला संधी मिळाली. या मालिकेच्या दोनच वर्षांनंतर तिला आशिकी या चित्रपटात काम करायला मिळाले. आशिकी या तिच्या पहिल्याच चित्रपटाने तिला सेलिब्रिटी बनवले. या चित्रपटामुळे ती रातोरात स्टार बनली असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. तिने या चित्रपटानंतर किंग अंकल, खलनायिका यांसारख्या काही चित्रपटांमध्ये काम केले. रिटर्न ऑफ ज्वेल थिफ या चित्रपटात ती १९९६ साली झळकली होती. या चित्रपटानंतर ती अभिनयापासून दूर गेली. ती कधी कोणत्या पुरस्कार सोहळ्यात अथवा फिल्मी पार्ट्यांमध्ये दिसली नाही. त्यामुळे अन्नू अग्रवाल कुठे गायब झाली हा तिच्या चाहत्यांना पडलेला प्रश्न आहे. अन्नूच्या आयुष्यात झालेल्या एका अपघातामुळे ती गेल्या अनेक वर्षांपासून या झगमगत्या दुनियेपासून दूर आहे. १९९९च्या सुमारास अन्नूचे संपूर्ण आयुष्यच बदलले असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. १९९९ला तिच्या गाडीला एक अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, ती जवळजवळ एक महिना कोमात होती. कोमातून बाहेर आल्यावरही अनेक महिने तिला उपचारांसाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात ठेवण्यात आले होते. या अपघातानंतर अन्नू संपूर्णपणे बॉलिवूडपासून दूर गेली. तिने कधीच कोणत्या चित्रपटात काम केले नाही.
अन्नू गेल्या अनेक वर्षांपासून बिहारमध्ये राहात असून ती तेथील लोकांना योगा शिकवते. तिने तिच्या आयुष्यावर एक पुस्तक देखील २०१५मध्ये लिहिले होते. तिच्या या पुस्तकाला लोकांनी चांगलीच पसंती दिली होती. अन्नू आता खूप वेगळी दिसत असून तिला ओळखणे देखील तिच्या फॅन्ससाठी कठीण आहे.

annu aggarwal

Also Read : महेश भट्ट सांगतायेत, या गोष्टीचा पूजा भट्टला झाला होता पश्चाताप 

Web Title: Learn what Ashishi Fame Annu Agarwal is doing now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.