casting couchबद्दल क्रिती सॅननने केला मोठा खुलासा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2017 15:58 IST2017-09-17T10:28:12+5:302017-09-17T15:58:12+5:30
कास्टिंग काऊच हा शब्द बॉलिवूडसाठी परका नाही. बॉलिवूडमध्ये काम मिळवून देण्याच्या आमिषाने नवख्या मुला-मुलींकडे शरिरसंबंधांची मागणी करणे, म्हणजेच कास्टिंग ...
.jpg)
casting couchबद्दल क्रिती सॅननने केला मोठा खुलासा!
क स्टिंग काऊच हा शब्द बॉलिवूडसाठी परका नाही. बॉलिवूडमध्ये काम मिळवून देण्याच्या आमिषाने नवख्या मुला-मुलींकडे शरिरसंबंधांची मागणी करणे, म्हणजेच कास्टिंग काऊच. गेल्या अनेक वर्षांत अनेक कलाकारांनी कास्टिंग काऊचबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत. अनेकजण बॉलिवूडमधील या वाईट गोष्टीला बळी पडले आहेत. अभिनेत्री क्रिती सॅनन ही सुद्धा यावर बोलली आहे. अर्थात कास्टिंग काऊचबद्दलचा बॉलिवूडमधील तिचा अनुभव जरा वेगळा आहे.
अलीकडे एका इव्हेंटमध्ये बोलताना क्रितीने कास्टिंग काऊचपासून बॉडी शेमिंगपर्यंतच्या अनेक गोष्टींवर परखड मते मांडलीत. मी बॉलिवूडमध्ये येण्याआधी इंजिनिअर होते. इंजिनिअरिंग सोडून बॉलिवूडमध्ये माझ्यासाठी खूप मोठा बदल होता. तेही गॉडफादर नसताना. गॉडफादर नसताना मी बॉलिवूडमध्ये आले आणि स्वबळावर यशही मिळवले. मी हिरोईन होणार असा विचार मी स्वप्नातही केला नव्हता. अचानक मी मॉडेलिंग करायला लागले. अचानक टीव्ही अॅड केल्या अन् नंतर मला बॉलिवूडमध्ये काम मिळाले. अर्थात त्यासाठी मी प्रचंड कष्ट घेतले. कारण हे कष्ट घेतले नसते तर मी आज काय करत असते, मला ठाऊक नाही.यादरम्यान मला कुठेही, कधीही कास्टिंग काऊचचा अनुभव आला नाही. मी एका चांगल्या एजन्सीशी जुळले आणि देवाच्या कृपेने मला अशा कुठल्याही गोष्टीतून जावे लागले नाही. बॉलिवूडमध्ये अनेक वर्षे राहिल्यानंतर माझे एक ठाम मत तयार झाले आहे. ते म्हणजे, कास्टिंग काऊचसारखी गोष्ट अस्तित्वात नाही. केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर अन्य कुठेही. तुम्ही परिस्थिती कशी हाताळता आणि तुमच्यातील टॅलेन्ट कसे प्रूव करता, यावरच सगळे काही अवलंबून आहे, असे क्रिती म्हणाली.
ALSO READ : सुशांत सिंह राजपूतसोबतच्या रिलेशनशिपवर अखेर बोलली क्रिती सॅनन!
अपयशाला कधीही घाबरू नका. कारण शेवटी अपयश हेच तुम्हाला घडवणार आहे. तुम्ही हे करू शकत नाही, हे म्हणण्याची संधी समोरच्याला देऊ नका. आधी लोक हिरोईनबद्दल फार बोलत नसत. तिला कायम चित्रपटात दुय्यम स्थान दिले जात असे. पण आता ही स्थिती बदलतेय. लोकांना महिलाप्रधान चित्रपट आवडू लागले आहेत, असेही ती म्हणाली.