तुरुंगातून बाहेर आल्यानंतर KRKचं पहिलं ट्विट, म्हणाला - '१० दिवसांत...'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 06:27 PM2022-09-13T18:27:21+5:302022-09-13T18:28:08+5:30

KRK: तुरुंगातून बाहेर आल्यानंतर केआरकेनं केलेलं ट्विट चर्चेत आले आहे.

KRK's first tweet after coming out of jail, said - 'In 10 days...' | तुरुंगातून बाहेर आल्यानंतर KRKचं पहिलं ट्विट, म्हणाला - '१० दिवसांत...'

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर KRKचं पहिलं ट्विट, म्हणाला - '१० दिवसांत...'

googlenewsNext

बॉलिवूडवर सातत्याने टीका करणारा अभिनेता आणि समीक्षक कमाल आर खान म्हणजेच KRK हा सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतो.  ३० ऑगस्टला त्याला वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. स्वर्गीय अभिनेते ऋषि कपूर आणि इरफान खान यांच्याबद्दल काही वादग्रस्त ट्विट केआरकेने केले होते. या ट्विट प्रकरणी केआरकेला पोलिसांनी गेल्या आठवड्यात मुंबई विमानतळावरून अटक केली होती. मात्र नंतर त्याला कनिष्ठ न्यायालयाने जामीन दिला आणि त्याची सुटका केली आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने पहिलं ट्विट केले आहे. त्याचे हे ट्विट चर्चेत आले आहे.

केआरकेने तुरूंगातून बाहेर पडल्यानंतर ट्विटरवर पहिली पोस्ट शेअर केली आहे. त्याने ट्विट केले की, मी १० दिवस तुरुंगात होतो तेव्हा निव्वळ पाण्यावर जगलो होतो. त्यामुळे माझे १० किलो वजन कमी झाले आहे.

त्याच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी त्याला चांगलेच सुनावले आहे. एकाने लिहले की, वैद्यकीयदृष्ट्या हे कसे शक्य आहे? प्रचंड श्रम करून आणि फक्त पाणी पिऊनही, १० दिवसांत १० किलो वजन कमी करणे अशक्य आहे. दुसर्‍याने लिहिले की इथून आणखी १० किलो स्नायू गमावण्याची कल्पना करा. एकीने लिहले की ‘१० दिवसात १० किलो वजन कमी झाले तुम्हाला जर २ महिने तुरुंगात ठेवलं तर तुम्ही अमर व्हाल.

 केआरकेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र त्यानंतर काही तासांमध्येच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एएनआयच्या रिपोर्टनुसार, मंगळवारी रात्री केआरकेच्या छातीमध्ये अचानक दुखू लागले. त्यानंतर त्याला लगेच कांदिवलीमधील शताब्दी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते.

Web Title: KRK's first tweet after coming out of jail, said - 'In 10 days...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.