अक्षय कुमारकडे पैसा कमवायला आता दोन-तीनच वर्षं शिल्लक राहिले, असे म्हणत अभिनेत्याने उडवली अक्षयची खिल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 03:18 PM2021-03-20T15:18:22+5:302021-03-20T15:19:16+5:30

या अभिनेत्याने केलेल्या ट्वीटची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

KRK tweets against Akshay Kumar and his films | अक्षय कुमारकडे पैसा कमवायला आता दोन-तीनच वर्षं शिल्लक राहिले, असे म्हणत अभिनेत्याने उडवली अक्षयची खिल्ली

अक्षय कुमारकडे पैसा कमवायला आता दोन-तीनच वर्षं शिल्लक राहिले, असे म्हणत अभिनेत्याने उडवली अक्षयची खिल्ली

googlenewsNext
ठळक मुद्देअक्षय कुमारचे चित्रपट प्रदर्शित झाले नसले तरी तो नवीन चित्रपट साईन करत आहे. आता अक्षयच्या बाबतीत एक ट्वीट कमाल खान म्हणजेच केआरकेने केले आहे.

अक्षय कुमारने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्याच्या चित्रपटांची वाट त्याचे चाहते आतुरतेने पाहात असतात. अक्षयचे वर्षाला चार तरी चित्रपट प्रदर्शित होतात. पण सध्या भारतात असलेल्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे वर्षभरात त्याचा केवळ लक्ष्मी बॉम्ब हा एकच चित्रपट प्रदर्शित झाला. लक्ष्मी बॉम्बदेखील चित्रपटगृहात नव्हे तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला.

अक्षय कुमारचे चित्रपट प्रदर्शित झाले नसले तरी तो नवीन चित्रपट साईन करत आहे. आता अक्षयच्या बाबतीत एक ट्वीट कमाल खान म्हणजेच केआरकेने केले आहे. केआरकेने अक्षय कुमारवर शाब्दिक हल्ला केला असून ट्वीटमध्ये लिहिले आहे की, अक्षय कुमारचे चित्रपट कोणी खरेदी करत नाहीये. सूर्यवंशी आणि बेलबॉटम यांसारखे चित्रपट प्रदर्शित होत नाहीयेत. पण तरीही तो एकामागोमाग एका चित्रपटाची घोषणा करत आहे. अक्षय दिवसातील 24 तास काम करत आहे. कारण त्याला माहीत आहे की, त्याच्याकडे केवळ दोन-तीन वर्षं बाकी आहेत. वेडे निर्माते देखील त्याला चित्रपटांचे 125 करोड रुपये देत आहेत. 

केआरकेचे हे ट्वीट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. या व्हिडिओवरून काही जण त्याला सुनावत आहेत तर काहींना त्याचे हे ट्वीट आवडत आहे. अक्षय कुमारच्या प्रगतीवर केआरके जळत आहे असे देखील काही त्याचे चाहते प्रतिक्रियांद्वारे सांगत आहेत.

केआरकेने कोणत्याही अभिनेत्यासोबत पंगा घेण्याची ही पहिली वेळ नाहीये. केआरकेने आतापर्यंत शाहरुख खान, सलमान खान यांच्यावर टीका केली आहे. 

Web Title: KRK tweets against Akshay Kumar and his films

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.