KRK ने Salman Khan वर लावला एक्स Somy Ali ला मारहाण केल्याचा आरोप, पुरावाही दिला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 05:10 PM2021-11-17T17:10:45+5:302021-11-17T17:11:49+5:30

KRK Vs Salman Khan : केआरकेने आरोप लावला आहे की, सलमान त्याची एक्स गर्लफ्रेन्ड सोमी अली (Somy Ali) हिला मारहाण करत होता.

KRK claim that Salman Khan beat his ex girlfriend Somy Ali | KRK ने Salman Khan वर लावला एक्स Somy Ali ला मारहाण केल्याचा आरोप, पुरावाही दिला

KRK ने Salman Khan वर लावला एक्स Somy Ali ला मारहाण केल्याचा आरोप, पुरावाही दिला

googlenewsNext

नेहमीच वादात राहणारा फिल्म क्रिटीक कमाल राशिद खान म्हणजे केआरके (KRK) काही दिवसांपासून सलमान खान विरोधात फारच बोलत आहे. काही महिन्यांपूर्वीच सलमान खानने (Salman Khan) केआरकेवर मानहानीचा दावा ठोकला होता. आता केआरकेने सलमान खानवर पुन्हा एक आरोप केला आहे. केआरकेने आरोप लावला आहे की, सलमान त्याची एक्स गर्लफ्रेन्ड सोमी अली (Somy Ali) हिला मारहाण करत होता. एका दिवसाआधीच सलमान खानची एक्स गर्लफ्रेन्ड सोमी अलीने ऐश्वर्या रायचं भरभरून कौतुक केलं होतं.

Bollywoodlife.com वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, सोमी म्हणाली होती की, ऐश्वर्या राय एकमेव बहादूर महिला आहे जिने कौटुंबिक हिंसेविरोधात (सलमान खान विरोधात) पोलिसात जाऊन तक्रार दिली होती. मी यासाठी तिचं कौतुक करते. आता केआरकेने सोमीच्या या वक्ताव्याला ढाल करून सलमान खानवर आरोप लावला आहे. 

केआरकेने ट्विट करत लिहिले की, 'सोमी अलीने तिच्या ताज्या मुलाखतीत म्हटलं होतं की, ऐश्वर्या राय एक बहादूर महिला आहे. तिने त्या वाईट माणसाला सडेतोड उत्तर दिलं होतं जो आपल्या प्रत्येक गर्लफ्रेन्डला मारहाण करत होता. त्याने मलाही मारलं होतं. पण मी त्याच्या विरोधात एफआयआर दाखल करू शकले नाही. प्रिय सोमी तू फारच लेट झाली आहे'. केआरकेने हे ट्विट नंतर ट्विट नंतर डिलीट केलं. 

केआरकेचं हे ट्विट आता व्हायरल झालं आहे. या ट्विटवर सलमान खानचे फॅन्स तुटून पडले आहेत आणि केआरकेवर आगपाखड करत आहेत. पण घाबरेल तो केआरके कसला? दरम्यान सोमी अली आणि सलमान खान साधारण पाच वर्षे एकमेकांसोबत होते. नुकतीच सोमी म्हणाली होती की, सलमानचे दुसऱ्या मुलींसोबत संबंध असल्याने ती त्याच्यापासून दूर गेली होती.
 

Web Title: KRK claim that Salman Khan beat his ex girlfriend Somy Ali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.