क्रिती सॅननने Relationship बदल केला 'हा' खुलासा, वाचून तुम्हीही व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 11:05 AM2019-02-28T11:05:45+5:302019-02-28T11:33:16+5:30

क्रिती सॅनन आणि कार्तिक आर्यनचा 'लुका छुप्पी' सिनेमा रसिकांचे मनोरंजन करण्यास तयार झाला आहे. या सिनेमाची कथा लिव्ह-इन रिलेशनशीपभवती फिरणारी आहे.

kriti sanon mother gave her green signal to be in relationship live in revealed in an interview luka chuppi | क्रिती सॅननने Relationship बदल केला 'हा' खुलासा, वाचून तुम्हीही व्हाल हैराण

क्रिती सॅननने Relationship बदल केला 'हा' खुलासा, वाचून तुम्हीही व्हाल हैराण

googlenewsNext
ठळक मुद्दे कार्तिक ग्वाल्हेरच्या एका मुलाची भूमिका साकारताना दिसणार आहे१ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय

क्रिती सॅनन आणि कार्तिक आर्यनचा 'लुका छुप्पी' सिनेमा रसिकांचे मनोरंजन करण्यास तयार झाला आहे. या सिनेमाची कथा लिव्ह-इन रिलेशनशीपभवती फिरणारी आहे. स्पॉटबॉयला दिलेल्या एका इंटरव्हयू दरम्यान क्रितीने खुलासा केला जो ऐकून तुम्हीसुद्धा हैराण व्हाला. यावेळी क्रितीला लिव्ह-इन रिलेशनबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी ती म्हणाली, मला आधी वाटायचा माझी आई या गोष्टीच्या विरोधात असेल. एक दिवशी आईने तिला फोन करुन विचारले तुला असे कसं वाटले मी लिव्ह-इन रिलेशनशीपच्या विरोधात आहे. क्रिती सांगते, आई लिव्ह-इनसाठी ओके आहे, वडील मात्र अजूनही नकार देऊ शकतात. कदाचित 'लुका-छुपी'बघितल्यानंतर ते यासाठी होकार देऊ देतील. 


सिनेमाबाबत बोलायचे झाले तर यात कार्तिक ग्वाल्हेरच्या एका मुलाची भूमिका साकारताना दिसणार आहे. लग्नासाठी उतावीळ असलेला कार्तिक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असतो.तो लग्नासाठी क्रितीला प्रपोजही करतो. पण क्रिती त्याला लिव्ह इनमध्ये राहण्याचा पर्याय सुचवते. यानंतर दोघांचे नाते चांगलेच गुंतते. इतके की, पुढे दोघेही खोट्या लग्नाच्या खोट्या बाता मारताना दिसतात.दिनेश विजान निर्मित हा चित्रपट सिनेमेट्रोग्राफर लक्ष्मण उतेकरने दिग्दर्शित केला आहे. या सिनेमातून कार्तिक आर्यन व क्रिती सॅनन ही जोडी प्रथमच प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. १ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. हा सिनेमा देशभरातील ३००० स्क्रिन्सवर रिलीज होतोय 

Web Title: kriti sanon mother gave her green signal to be in relationship live in revealed in an interview luka chuppi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.