​किंग ऑफ रोमान्स शाहरुख खान साकारणार भूताची भूमिका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 14:31 IST2017-09-06T09:01:43+5:302017-09-06T14:31:43+5:30

शाहरुख खानच्या कारकिर्दीला २५ वर्षांहून अधिक वर्षं झाली असून या दरम्यान त्याने एकापेक्षा एक चित्रपट दिले आहेत. दिलवाले दुल्हनिया ...

King of Romance Shah Rukh Khan to play ghost role? | ​किंग ऑफ रोमान्स शाहरुख खान साकारणार भूताची भूमिका?

​किंग ऑफ रोमान्स शाहरुख खान साकारणार भूताची भूमिका?

हरुख खानच्या कारकिर्दीला २५ वर्षांहून अधिक वर्षं झाली असून या दरम्यान त्याने एकापेक्षा एक चित्रपट दिले आहेत. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, कुछ कुछ होता है, दिल तो पागल है यांसारख्या चित्रपटात त्याचा रोमँटिक अंदाज आपल्याला पाहायला मिळाला. तर डर, बाजीगर, अंजाम यांसारख्या चित्रपटात तो खलनायकाच्या भूमिकेत झळकला तर चक दे इंडिया या चित्रपटात प्रेक्षकांना त्याचे वेगळे रूप पाहायला मिळाले होते. शाहरुखने आजवरच्या त्याच्या कारकिर्दीत नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने एक अभिनेता नव्हे तर एक निर्माता म्हणून त्याचे नाव कमावले आहे. त्याने मै हूँ ना, पहेली, रईस यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्याने आतापर्यंत सगळ्या रोमँटिक अथवा ड्रामा चित्रपटांची निर्मिती केली आहे आणि आता त्याला एका वेगळ्या जॉनरच्या चित्रपटाची निर्मिती करण्याची इच्छा आहे आणि त्याने त्याची ही इच्छा व्यक्त देखील केली आहे.
शाहरुखने नायक, खलनायकाची भूमिका साकारल्यानंतर आता त्याला एक वेगळी भूमिका साकारण्याची इच्छा आहे. त्याने त्याच्या आजवरच्या कारकिर्दीमध्ये कधीच हॉरर चित्रपटामध्ये काम केले नाही. पण त्याला आता एखाद्या हॉरर चित्रपटात काम करायचे आहे. एका वेगळ्या भूमिकेच्या तो शोधात आहे. त्यामुळे भविष्यात शाहरुख प्रेक्षकांना हॉरर चित्रपटात दिसला तर नवल वाटायला नको. एवढेच नव्हे तर हॉरर चित्रपट आपल्या देशात तितकेसे बनवले जात नाही. इतर जेनरमध्ये जेवढे प्रयोग केले जातात तेवढे हॉरर जेनरमध्ये केले जात नाही असे मला नेहमी वाटत असल्याने हॉरर चित्रपटांची निर्मिती करण्याचा तो विचार करत असल्याची देखील फिल्मफेअर या वेबसाईटने बातमी दिली आहे. 
हॉरर चित्रपट हा चांगल्या रितीने बनवला गेला तर प्रेक्षकांना तो नक्कीच आवडतो असे शाहरुखचे मत असल्याने हॉरर चित्रपटाची तो भविष्यात निर्मिती करणार आहे. त्यामुळे शाहरुख प्रेक्षकांना भूताच्या भूमिकेत दिसणार आणि या भूमिकेद्वारे प्रेक्षकांना घाबरवणार असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

Also Read : शाहरुख खानची मुलगी सुहाना खान दिसली 'या' दिग्दर्शकाची ऑफिसमध्ये

Web Title: King of Romance Shah Rukh Khan to play ghost role?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.