Sidharth Malhotra आणि Kiara Advaniच्या शाही लग्नाचा वेन्यू ठरला, कुटुंबीयांनी सुरु केली तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 12:00 PM2022-12-09T12:00:47+5:302022-12-09T12:22:31+5:30

सिद्धार्थ आणि कियाराच्या या ग्रँड लग्नाला फक्त कुटुंब आणि जवळचे मित्र सहभागी होणार आहेत.

Kiara Advani and Sidharth Malhotra wedding to be held chandigarh says report | Sidharth Malhotra आणि Kiara Advaniच्या शाही लग्नाचा वेन्यू ठरला, कुटुंबीयांनी सुरु केली तयारी

Sidharth Malhotra आणि Kiara Advaniच्या शाही लग्नाचा वेन्यू ठरला, कुटुंबीयांनी सुरु केली तयारी

googlenewsNext

Kiara Advani Sidharth Malhotra Wedding: सध्या चित्रपटसृष्टीत लग्नाचा सीझन सुरू आहे. अलिकडेच हंसिका मोटवानीने तिचा बॉयफ्रेंड सोहेल कथुरिया(Hansika Motwani Wedding)सोबत लग्नगाठ बांधली.आता कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​(Kiara Advani-Sidharth Malhotra Wedding) देखील लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. त्यांच्या अफेअर्सच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत होत्या. जरी दोघांनी अद्याप त्यांच्या नात्याबद्दल मीडियाला कोणतेही वक्तव्य दिलेले नाही. पण काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे कपल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. यासाठी दोघांच्या कुटुंबीयांनीही तयारी सुरू केली आहे.

रिपोर्टनुसार कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​ (Kiara Advani-Sidharth Malhotra Wedding)  यांच्या लग्नाचा वेन्यू फिक्स झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार सिद्धार्थ आणि कियारा यांचा विवाह चंदीगडमधील ग्रँड हॉटेल ओबेरॉय सुखविलासमध्ये होणार आहे. चंदिगडमध्ये लग्न करण्यामागचं कारण अभिनेत्याचे कुटुंबीय दिल्लीस्थित आहे. चंदिगड हे दिल्लीच्या जवळ आहे. सिद्धार्थच्या नातेवाईकांना दिल्ली ते चंदीगड प्रवास करणे सोपे होणार आहे.

सिद्धार्थ आणि कियाराच्या या ग्रँड लग्नाला फक्त कुटुंब आणि अगदी जवळचा मित्र-परिवार उपस्थित राहणार असल्याचं बोलले जातं आहे. यासाठी सिद्धार्थच्या कुटुंबीयांनी पाहुण्यांची यादी फायनल केली आहे. लग्नानंतर दोघे मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शन पार्टी देणार आहेत. ज्यामध्ये बी-टाऊन इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींचा समावेश असेल. ज्यात शाहिद कपूर, विकी कौशल, भूमी पेडणेकर यांसारख्या स्टार्सची नावे समोर आली आहेत. सध्या पाहुण्यांच्या यादीत करण जोहर आणि अश्विनी यार्दी या दोन नाव कन्फर्म आहेत. 

Web Title: Kiara Advani and Sidharth Malhotra wedding to be held chandigarh says report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.