कॅटरिना ‘ट्यूबलाईट’मधून आऊट!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2016 20:40 IST2016-07-03T15:10:13+5:302016-07-03T20:40:13+5:30
बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ हिच्या चाहत्यांच्या आनंदावर विरजण घालणारी एक बातमी आहे. होय, कबीर खानच्या आगामी ‘ट्यूबलाईट’ या चित्रपटात ...

कॅटरिना ‘ट्यूबलाईट’मधून आऊट!!
ब लिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ हिच्या चाहत्यांच्या आनंदावर विरजण घालणारी एक बातमी आहे. होय, कबीर खानच्या आगामी ‘ट्यूबलाईट’ या चित्रपटात कॅटरिना दिसणार अशी चर्चा होती. पण कॅटरिना या चित्रपटात नसणार आहे. सुपरस्टार सलमान खान यात लीड रोलमध्ये आहे. त्याच्या अपोझिट कॅटरिना दिसणार असल्याची बातमी होती. पण कॅटरिना नाही तर दुसरीच अभिनेत्री ‘ट्यूबलाईट’मध्ये दिसणार आहे. आता ती कोण, हे अद्याप फायनल व्हायचे आहे. ‘ट्यूबलाईट’हा सलमानसोबतचा कबीरचा तिसरा चित्रपट असेल. यापूर्वी २०१२ मध्ये ‘एक था टायगर’ आणि गतवर्षी ‘बजरंगी भाईजान’मध्ये सलमान दिसला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलैअखेरिस लडाखमध्ये कबीरच्या या सिनेमाचे शूटींग सुरु होण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर तो रिलीज होईल.