'या' बायोपिकमध्ये प्रेयसीच्या भूमिकेत दिसणार कॅटरिना कैफ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2018 15:42 IST2018-05-09T10:12:28+5:302018-05-09T15:42:28+5:30
गतवर्षी कॅटरिना कैफ सलमान खानसोबत 'टायगर जिंदा है' चित्रपटात दिसली होती. कॅटरिनाचा आगामी चित्रपट बायोपिक असू शकतो. सलमान खान ...

'या' बायोपिकमध्ये प्रेयसीच्या भूमिकेत दिसणार कॅटरिना कैफ
ग वर्षी कॅटरिना कैफ सलमान खानसोबत 'टायगर जिंदा है' चित्रपटात दिसली होती. कॅटरिनाचा आगामी चित्रपट बायोपिक असू शकतो. सलमान खान भारतमध्ये दिसणार आहे याच दरम्यान अशी बातमी कानावर येते आहे की कॅट करगिल युद्धमध्ये शहिद झालेल्या विक्रम बत्रा यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. करण जोहरच्या याचित्रपटासाठी कॅटरिना कैफला अप्रोच करण्यात आले होते. टाईम्सच्या रिपोर्टनुसार कॅटरिना आणि चित्रपटाचे मेकर्सची यासंदर्भात चर्चा झाली आहे. कॅटरिनाला या चित्रपटातील भूमिका आवडली देखील आहे. फक्त तिचा होकार बाकी आहे. चित्रपटाचे नाव 'शेर शाह' ठेवण्यात आले आहे. यात मुख्य भूमिकेत सिद्धार्थ मल्होत्रा दिसणार आहे.
विक्रम बत्रा पंजाब युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी होते कॉलेजमध्ये असताना त्यांची ओळख डिंपल चीमा यांच्याशी झाली होती. 4 वर्ष ते दोघे रिलेशनशीपमध्ये होते. यानंतर विक्रम बत्रा यांना करगिल युद्धावर जावे लागले होते. विक्रम कारगिल युद्धावरुन परत आल्यानंतर डिंपल यांच्याशी लग्न करणार होते मात्र करगिलवरुन ते शहिद झाल्याची बातमी आली. याचित्रपटात डिंपल यांची भूमिका कॅटरिना कैफ साकारू शकते. विष्णु वरदान या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. 2016 मध्ये आलेल्या 'बार बार देखो'मध्ये कॅटरिना आणि सिद्धार्थ यांनी एकत्र स्क्रिन शेअर केली होती.
ALSO READ : कॅटरिना कैफने सर्वांसमोर शेअर केले तिचे सीक्रेट, म्हटले...?
कॅटरिना शाहरुख खानच्या ‘झिरो’ चित्रपटात दिसणार आहे. यात अनुष्का शर्माची ही महत्त्वाची भूमिका आहे. शाहरुख खान या चित्रपटात एका बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातील शाहरूखची व्यक्तीरेखा ‘गेम आॅफ थ्रोन्स’ या इंग्रजी सीरिजमधील टीरिनयल लेनिस्टर या पात्रावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. ख्रिसमला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.