आमिरने दिल्या करिनाला टिप्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2016 13:37 IST2016-07-21T08:07:33+5:302016-07-21T13:37:33+5:30
करिना कपूरला बाळ होणार आहे हे कळल्यापासून इंडस्ट्रीतील तिचे मित्रमैत्रीण तिला आणि सैफला भेटून शुभेच्छा देत आहे. नुकतीच करिना ...
.jpg)
आमिरने दिल्या करिनाला टिप्स
क िना कपूरला बाळ होणार आहे हे कळल्यापासून इंडस्ट्रीतील तिचे मित्रमैत्रीण तिला आणि सैफला भेटून शुभेच्छा देत आहे. नुकतीच करिना वांद्रे येथील एका स्टुडिओमध्ये एका जाहिरातीचे चित्रीकरण करत होती. त्याच स्टुडिओमध्ये आमिर खानही त्याच्या चित्रपटाचे चित्रीकरण करत होता. आमिर आणि करिनाने थ्री इडियट या चित्रपटात एकत्र काम केले आहे. तेव्हापासूनच त्या दोघांची खूपच चांगली मैत्री आहे. करिना आपल्याच स्टुडिओमध्ये चित्रीकरण करत आहे हे कळल्यावर आमिर तिला भेटायला गेला. आमिरने तिला शुभेच्छा तर दिल्या. पण त्याचसोबत त्या दोघांनी लंचही एकत्र केला. त्यावेळी त्यांनी खूप साऱ्या गप्पा मारल्या. करिना गर्भवती असल्याने तिने तिच्या खाण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे असे आमिरने तिला सांगितले. एवढंच नव्हे तर तिने काय खायला पाहिजे आणि काय नाही याच्या टिप्सदेखील दिल्या. तसेच तुझ्यासाठी आता कॉफी चांगली नाहीये, कॉफी पिणे सोडून दे असा सल्लाही तिला दिला.