सप्टेंबरमध्ये सुरु करणार करिना कपूर 'वीरे दी वेडिंग'चे शूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2017 11:36 IST2017-07-11T09:42:57+5:302017-07-12T11:36:58+5:30

गेल्या अनेक दिवसांपासून पतौडी घराण्याची सून करिना कपूर कामावर परतणार असल्याची चर्चा होती. कामावर परतण्याआधी ती सध्या जीममध्ये जाऊन ...

Kareena Kapoor shoots 'Veerre The Wedding' in September | सप्टेंबरमध्ये सुरु करणार करिना कपूर 'वीरे दी वेडिंग'चे शूट

सप्टेंबरमध्ये सुरु करणार करिना कपूर 'वीरे दी वेडिंग'चे शूट

ल्या अनेक दिवसांपासून पतौडी घराण्याची सून करिना कपूर कामावर परतणार असल्याची चर्चा होती. कामावर परतण्याआधी ती सध्या जीममध्ये जाऊन वर्क आऊट करताना दिसतेय. करिना 'वीरे दी वेडिंग' चित्रपटाची शूटिंग सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. याचित्रपटाच्या शूटिंग आधी तिने तब्बल 19 किलो वजन कमी केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चित्रपट फ्लोअरवर यायला खूप अडचणी येत होत्या. मात्र आता चित्रपटाच्या शूटिंगची तयार सुरु होतेय. करिना पुढच्या 2 महिन्यात या चित्रपटाची शूटिंग सुरु करणार आहे. याशिवाय चित्रपटातील काही महत्त्वाच्या सीन्सचे शूटींगही दिल्लीतच होणार आहे. 

यात करिना कपूरसह स्वरा भास्कर, सोनम कपूर आणि  शिखा तल्सानिआ आहे यांच्या सुद्धा भूमिका आहेत. या चित्रपटात करिना कपूर सुमित व्याससोबत रोमांस करताना दिसणार असल्याचे समजते आहे. सुमित याआधी पर्मानेंट रूममेट्स यावेबसीरिजमध्ये दिसला होता. याशिवाय त्यांने अनेक मालिकांमध्ये ही काम केले आहे. वीरे दी वेडिंगची निर्मिती एकता कपूर आणि रिया कपूर करणार आहेत. करिनाने प्रेग्नंसी आधी हा चित्रपट साईन केला होता. त्यानंतर ती मैटरनिटी लीव्हवर गेली होती. तैमूर आता 6 महिन्यांचा झाला आहे. त्यामुळे करिनाने ही कामावर परतण्याचा निर्णय घेतला आहे. 'वीरे दी वेडिंग'मध्ये ती एका आधुनिक मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे तर सोनम दिल्लीतील मध्यमवर्गीय मुलगी साकारणार आहे. बेबो प्रॅक्टिकल तर सोनमला थोडीशी हळवी असेल. आपल्याला जे वाटते, ज्यामुळे आनंद मिळतो त्याच गोष्टी करण्यात ती विश्वास ठेवणारी मुलगी आहे.’ करिना कपूरला या चित्रपटाची स्क्रिप्ट फारच आवडली होती. 

Web Title: Kareena Kapoor shoots 'Veerre The Wedding' in September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.