करण जोहरच्या यश आणि रूहीला भेटून हरकून गेला करिना कपूरचा लाडका तैमूर, पाहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2017 22:21 IST2017-12-09T16:51:19+5:302017-12-09T22:21:47+5:30
तैमूर आणि करण जोहरची जुळी मुले यश आणि रूही यांची अखेर भेट झाली, यावेळी तिघांनी एकमेकांची कंपनी खूप एन्जॉय केली. वाचा सविस्तर!

करण जोहरच्या यश आणि रूहीला भेटून हरकून गेला करिना कपूरचा लाडका तैमूर, पाहा फोटो!
न र्माता करण जोहर सध्या आपल्या जुळ्या मुलांचे पालनपोषण करण्यासाठी कुठलीच कसर सोडत नसताना दिसत आहे. सरोगसी पद्धतीने करण यश आणि रूही या जुळ्या मुलांचा बाप बनला. करणने मुलाचे नाव वडील यश जोहर तर मुलीचे नाव आई हिरू जोहर यांच्या नावातील अक्षरांवरून ठेवले. करण त्याच्या मुलांवर प्रचंड प्रेम करत असून, त्यांना एक क्षणही दूर ठेवत नाही. खरं तर मुलांच्या आगमनामुळे करणच्या आयुष्याला एक वेगळेच वळण मिळाले आहे. करणने तर घराबरोबरच आॅफिसमध्येही मुलांसाठी नर्सरी बनविली आहे.परफेक्ट फादर बनण्यासाठी तो सातत्याने प्रयत्नशील आहे.
आज अभिनेत्री राणी मुखर्जीची मुलगी अदिराचा दुसरा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी करण त्याच्या दोन्ही मुलांना बर्थ डे पार्टीत घेऊन आला होता. या पार्टीत करिनाचा लाडका तैमूरही उपस्थित होता. वास्तविक करण त्याच्या दोन्ही मुलांना तैमुरला त्याच्या वाढदिवशी भेटवू इच्छित होता. परंतु याची संधी त्याला अदिराच्या वाढदिवशीच मिळाली. आश्चर्याची बाब म्हणजे तैमूर, यश आणि रूही एकमेकांना भेटून खूपच आनंदी झाल्याचे दिसून आले. तिघांनाही एकमेकांची कंपनी खूपच आवडली. यावेळी त्यांनी एकमेकांची कंपनी खूपच एन्जॉय केली.
तैमरने पार्टीत पिवळ्या रंगाचा शर्ट घातला होता. या लूकमध्ये तो खूपच क्यूट दिसत होता. तर यश आणि रूहीने निळ्या आणि पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. या लूकमध्ये दोघे खूप सुंदर दिसत होते. करणने या तिघांचा एकत्रित फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. फोटोला कॅप्शन देताना करणने लिहिले की, ‘नव्या मैत्रीला सुरुवात’ दरम्यान, अदिराच्या बर्थ डे पार्टीत शाहरूख खानचा मुलगा अबराम खान, तुषार कपूरचा मुलगा लक्ष्य हेदेखील उपस्थित होते.