करण जोहरच्या जुळ्या मुलांची सर्वांत अगोदर ‘या’ व्यक्तीने घेतली भेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2017 16:34 IST2017-03-26T11:02:16+5:302017-03-26T16:34:27+5:30

दिग्दर्शक करण जोहर हा सरोगसी पद्धतीने जुळ्या मुलांचा बाप बनल्याचे जाहीर होताच, बॉलिवूडमधील प्रत्येक व्यक्ती त्याच्या यश आणि जुही ...

Karan Johar's twin children are the first person to take this 'gift' gift! | करण जोहरच्या जुळ्या मुलांची सर्वांत अगोदर ‘या’ व्यक्तीने घेतली भेट!

करण जोहरच्या जुळ्या मुलांची सर्वांत अगोदर ‘या’ व्यक्तीने घेतली भेट!

ग्दर्शक करण जोहर हा सरोगसी पद्धतीने जुळ्या मुलांचा बाप बनल्याचे जाहीर होताच, बॉलिवूडमधील प्रत्येक व्यक्ती त्याच्या यश आणि जुही या जुळ्या मुलांची एक झलक बघण्यासाठी आतुर आहेत. करणने काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते की, मी माझ्या मुलांचे फोटो सर्वांसोबत शेअर करण्यास उत्सुक आहे. परंतु ही योग्य वेळ नाही. मात्र एक व्यक्ती अशी आहे, जो करणच्या फोटोंची अजिबात वाट बघू शकत नाही. त्याने थेट हॉस्पिटलमध्ये जाऊन मुलांना डोळे भरून न्याहाळले. आता हा व्यक्ती कोण असेल, असा कदाचित तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर हा दुसरा तिसरा कोणी नसून, करणचा जवळचा मित्र अयान मुखर्जी हा आहे. त्याने थेट हॉस्पिटल गाठत मुलांची भेट घेतली. 

प्रीबर्थमुळे मुलांना हॉस्पिटलमध्येच ठेवण्याचा डॉक्टरांनी निर्णय घेतला होता. एक दिवसापूर्वीच करणने हॉस्पिटलमध्ये जाऊन मुलांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांशी चर्चा केली होती. तसेच अशीही माहिती समोर आली की, करण या महिन्याच्या अखेरीस मुलांना घरी घेऊन जाणार आहे. जेव्हा करण हॉस्पिटलमध्ये गेला होता, तेव्हा त्याच्यासोबत अयान मुखर्जी हादेखील उपस्थित होता. त्यानेदेखील मुलांची भेट घेतली. त्याचबरोबर अयान करणच्या मुलांना भेटलेला पहिला सेलिब्रिटी ठरला आहे. 



करणने वडील बनल्याचे जाहीर केल्यानंतर आता तो एक वर्षाचा ब्रेक घेऊ इच्छितो, जेणेकरून त्याला मुलांचा सांभाळ करता येईल. सोशल मीडियावरून जुळ्या मुलांचा बाप झाल्याचे जाहीर करताना करणने स्पष्ट केले होते की, मी एक चांगला बाप बनण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार. त्यामुळेच कदाचित त्याने ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला असावा. यावेळी करणने म्हटले होते की, मला तुमच्यासोबत ही गोड बातमी सांगताना आनंद होत आहे की, माझ्या आयुष्यात जुही आणि यश या जुळ्या गोंडस मुलांना प्रवेश केला आहे. मी स्वत:ला खरोखरच भाग्यवान समजतो की, मेडिकल सायन्सच्या मदतीने मी बाप बनू शकलो.

पुढे बोलताना करणने असेही म्हटले होते की, मी हा निर्णय खूप विचारपूर्वक घेतला आहे. जेव्हा मला असे वाटले की, मी एक वडील म्हणून सर्व जबाबदाºया पार पाडू शकतो तेव्हाच याबाबतचा निर्णय घेतला. आता माझे मुलेच माझे सर्वस्व असून, त्यांची सर्वोतोपरी जबाबदारी यासच माझे पहिले प्राधान्य असेल, असेही त्याने म्हटले होते. आता करण लवकरच त्याच्या या चिमुकल्यांना घरी घेऊन जाणार असून, तो एक पिता म्हणून कसा यशस्वी होईल याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. 

ALSO READ : SEE PIC : आपल्या जुळ्या मुलांना बघण्यासाठी करण जोहर पोहचला हॉस्पिटलमध्ये!!

Web Title: Karan Johar's twin children are the first person to take this 'gift' gift!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.