कपिलच्या ‘त्या’आॅफिसचे बांधकामच अवैध ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2016 13:07 IST2016-09-09T07:37:29+5:302016-09-09T13:07:29+5:30
कपिल शर्माने महापालिकेच्या अधिकाऱ्यानी आॅफिस बांधकामाच्या मंजुरीसाठी ५ लाखाची मागणी केल्याचा आरोप करीत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विट ...

कपिलच्या ‘त्या’आॅफिसचे बांधकामच अवैध ?
मात्र ट्विटला 6 तास उलटण्याच्या आधीच अधिक तपास केला असता वर्सोव्यातील या आॅफिसचं बांधकामच अवैध असल्याचा दावा स्थानिक सामाजिक कार्यकर्ते राजेश मुदगल यांनी केला आहे. वर्सोव्याच्या ज्या भागात हे आॅफिस थाटलं जातंय, तो भाग, रहिवाशी बांधकामासाठी राखीव आहे. पण त्याच भागात व्यावसायिक बांधकाम सुरु असल्याचा आरोप आहे.
दरम्यान लाचखोर अधिकाऱ्याचं नाव कपिल शर्माने उघड करावं असं आवाहन मुंबई पालिकेनं केलंय. याप्रकरणाची चौकशी करुन कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी ट्वीटद्वारे दिलं आहे.