कंगना म्हणते, मला माझे काम आवडत नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2016 22:01 IST2016-12-03T22:01:56+5:302016-12-03T22:01:56+5:30
बॉलिवूडमध्ये ज्या अभिनेत्रींनी अभिनयाच्या बळावर स्थान मिळविले आहे, अशात अभिनेत्री कंगना रानौतचा उल्लेख आर्वजून केला जातो. तिच्या अभिनय क्षमतेविषयी ...

कंगना म्हणते, मला माझे काम आवडत नाही
कंगना रानौतने अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. केवळ नायिकेच्या बळावर तिने चित्रपटांना यश मिळवून दिले आहे. अनेक पुरस्कारही तिच्या पदरात पडले आहेत. मात्र तिला स्वत:ला तिचे काम आवडत नाही असे ती म्हणतेय. कंगना म्हणाली, मी प्रामाणिकपणे सांगते, मी आतापर्यंत ज्या चित्रपटात मी व्यक्तीरेखा साकारल्या आहेत त्या मला अजिबात आवडत नाहीत. एकंदर मला माझे काम आवडतच नाही. मी ज्या भूमिका साकारल्या आहेत अशा व्यक्तींशी मला भेटणे किंवा तशी परिस्थिती जगणे देखील आवडणार नाही. मग त्या खºया असोत किंवा काल्पनिक असोत.
मला शून्य तापमानात चिखलात किंवा थंड पाण्यात जायला देखील आवडत नाही. हे काम मला करावे वाटणारच नाही. तू चित्रपटांची निवड कशी करते याविषयी विचारल्यावर ती हसत म्हणाली, मला मला माझी बिले सांगतात आता ही भरायची आहे. अशाच पद्धतीने चित्रपटांची निवड करते. अभिनेत्यांना यांत्रिक राहून चालत नाही, त्यांना भावनात्मकता, संवेदनशीलता दाखवावी लागते. क्वीन या चित्रपटाची आठवण करीत कंगना म्हणाली, हा चित्रपट कसा भावनात्मक होत गेला हे आपण पाहिले आहे. कट्टी और बट्टी या चित्रपटात मला कॅन्सरपीडितेची भूमिका साकारायची होती. यासाठी मला रडावे लागले होते. मी भावनात्मक एवढ्या जवळ गेले की त्याचा परिणाम माझ्या तब्येतीवर झाला. दिग्दर्शनाविषयी कंगणा म्हणाली, जेव्हा मला वाटेल की आता दिग्दर्शन करायला हवे तेव्हा मी ते करेलच. त्यासाठी काहीतरी क्रियेटिव्ह करावे लागते, आता मी ते करीतच आहे.