​कमल हासनवर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप; याचिका दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2017 15:33 IST2017-03-21T10:03:31+5:302017-03-21T15:33:31+5:30

साऊथ सुपरस्टार कमल हासनने पुन्हा एकदा वाद ओढवून घेतला आहे. हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणारे वक्तव्य केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात ...

Kamal Haasan accused of hurt Hindus' feelings; Petition filed | ​कमल हासनवर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप; याचिका दाखल

​कमल हासनवर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप; याचिका दाखल

ऊथ सुपरस्टार कमल हासनने पुन्हा एकदा वाद ओढवून घेतला आहे. हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणारे वक्तव्य केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला असून याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.
  हिंदू मक्कल काची संघटनेने तिरुनवेली जिल्हा न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे.  यापूर्वी हिंदू मक्कल काची संघटनेच्या सदस्यांनी गत १५ मार्चला चेन्नईतील पोलीस आयुक्तालयात कमलविरोधात तक्रार दाखल केली होती. मीडिया रिपोर्टनुसार, एका तामिळ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कमल हासनने महाभारतावर एक वादग्रस्त टिपणी केली. ‘महाभारतात पुरुष जुगार खेळत असताना द्रौपदीचा एक प्यादा म्हणून वापर केला गेला. तिला दुय्यम स्थान दिले गेले. ज्या महाभारतात, जुगारासाठी महिलेचा एक प्यादा म्हणून वापर झाला, त्या महाभारताला हा देश मान देतो,’असे वक्तव्य कमलने केले होते.

ALSO READ : जयललितांविषयी ट्वीट केलेल्या कमल हसनला नेटीझन्सने धरले धारेवर

हिंदू मक्कल काचीचे प्रदेश सरचिटणीस रामा रवीकुमार यांनी त्याच्या या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. महाभारतातबद्दल अशा आक्षेपार्ह गोष्टी बोलायची कमल हसन यांना गरज नव्हती.   महाभारताबद्दल बोलण्याचा अधिकार त्यांना कुणी दिला? ते हिंदूविरोधी आहेत. म्हणून आम्ही त्यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे,असे ते म्हणाले.
यापूर्वीही कमलने असेच अनेक वाद ओढवून घेतले आहेत. ‘विश्वरूपम’ सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा अनेक मुसलमान समुहांनी या सिनेमाला विरोध केला. या सिनेमात कथितरित्या मुस्लिम धमार्ची नकारात्मक बाजू दाखवण्यात आली होती. यानंतर राज्यात सुरक्षित वाटेल असे काहीच शिल्लक नाही. त्यामुळे इथून निघून दुसरीकडे राहायला जाण्याचा विचार मनात येतो, असे वक्तव्य कमल हसनने केले होते.  

  

Web Title: Kamal Haasan accused of hurt Hindus' feelings; Petition filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.